पुणे - गेल्या 24 तासात लोणावळा शहरासह परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. तसेच मावळ परिसरात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरु आहे. लोणावळ्यामध्ये मागील 24 तासात 148 मिलीमीटर पावसाची नोेंद करण्यात आली आहे.
लोणावळा आणि मावळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासात 148 मिलीमीटर पाऊस झाला असून यावर्षाी एकूण 965 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर, मागच्या वर्षी याच दिवशी 173 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी झाल्याचे आकडेवारीतून निदर्शनास येत आहे.
हेही वाचा - पुणे महापालिकेच्या रुग्णालयात मनुष्यबळच नाही, ३० पेक्षा अधिक रुग्णालये बंद
लोणावळा शहर हे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. गेल्या 24 तासात शहरासह परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे सपुर्णं परिसर हिरवागार दिसत आहे. ऐरव्ही पावसाळ्यात येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. दरवर्षी हा परिसर पर्यटकांनी गजबजलेला असतो. परंतु, यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्याधिकाऱ्यांनी पर्यटकांना बंदी घातली आहे. तरीही, काही पर्यटक नियम झुगारून फिरताना आढळल्याचे निदर्शन आल्याने त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.