ETV Bharat / state

बारामतीत मोफत म्युकरमायकोसिस शिबिराचे आयोजन, शिबिरात आढळले १४ रुग्ण - म्युकरमायकोसिस लेटेस्ट अपडेट

बारामतीत राज्यातील पहिले मोफत म्युकर मायकोसिस रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ६५० हून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत १४ म्युकर मायकोसिसचे रुग्ण आढळून आले. या शिबिराचे दर बुधवारी आयोजन केले जाणार आहे.

mucormycosis patients ,  mucormycosis baramati ,  mucormycosis free camp baramati ,  म्युकरमायकोसिस शिबीर बारामती ,  म्युकरमायकोसिस लेटेस्ट अपडेट ,  म्युकरमायकोसिस कॅम्प
baramti
author img

By

Published : May 20, 2021, 10:04 AM IST

बारामती- कोरोना सारख्या वैश्विक महामारीचे थैमान अद्याप सुरूच असताना म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराने डोके वर काढले आहे. प्रामुख्याने कोरोना मुक्त झालेल्या काही रुग्णांमध्ये हा आजार दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीत राज्यातील पहिले मोफत म्युकर मायकोसिस रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. याबाबत ईटीव्ही भारतने केलेला हा विशेष रिपोर्ट..

प्रत्येक बुधवारी होणार शिबीर-

बारामती येथील नटराज नाट्य कला मंडळ व इंडियन डेंटल असोसिएशन फलटण- बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने बारामतीत बुधवारी मोफत म्युकर मायकोसिस रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ६५० हून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत १४ म्युकर मायकोसिसचे रुग्ण आढळून आले. या शिबिराचे दर बुधवारी आयोजन केले जाणार आहे. या शिबिरात लक्षणे आढळून येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांवर बारामतीतच एका स्वतंत्र कक्षाची स्थापना करून मोफत उपचार करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रस्ताव ठेवला जाणार असल्याची माहिती ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

बारामतीत मोफत म्युकरमायकोसिस शिबिराचे आयोजन..

योग्य वेळी उपचार घेणे गरजेचे..

कोणतीही भीती न बाळगता योग्य वेळी उपचार घेतल्यास हा आजार बरा होतो. दात दुखणे, दातातून फस येणे, तोंडाचा अर्धा भाग दुखणे, टाळूवरती तपकिरी किंवा काळसर डाग पडणे, डोळे लाल होणे, ताप येणे, नाकातून दुर्गंधी येणे आदी लक्षणे दिसताच तात्काळ उपचार करून घ्यावेत. या शिबिरात १४ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यांचे एमआरआय, सिटीस्कॅन, स्वॅब, आधी चाचण्या आजच केल्या जाणार असून काही रुग्णांवर शस्त्रक्रिया करावी लागणार असेल तर ती शस्त्रक्रिया मी स्वतः करणार असल्याचे इंडियन डेंटल असोसिएशनचे फलटण शाखेचे अध्यक्ष डॉ. विश्वराज निकम यांनी सांगितले.

महात्मा फुले योजनेअंतर्गत रुग्णांवर होणार उपचार..

म्युकर मायकोसिसच्या रुग्णांना आवश्यक असणाऱ्या औषधांचा पुरवठा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केला जाणार आहे. तसेच बारामतीत महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमधून सदर रुग्णांवर सर्व उपचार केले जाणार आहे. हा आजार गंभीर असून त्याचे उपचारही महागडे आहेत. या पार्श्वभूमीवर लवकरच एखाद्या शासकीय जागेत ३० बेडचे स्वतंत्र म्युकर मायकोसिसचे रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये बारामती मधील शासकीय व खाजगी रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जाणार आहेत.अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.