दौंड - तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींसाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, आज दुसऱ्या दिवसापर्यंत तालुक्यातुन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण १३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही..
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दिनांक २३ डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिल्या दिवशी दौंड तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींसाठी एक ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नव्हता.
दुसऱ्या दिवशी १३ उमेदवारी अर्ज..
आज २४ डिसेंबर रोजी दौंड तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहिती नुसार, एकूण १३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर एकूण उमेदवारांची संख्या १२ इतकी आहे. एका उमेदवाराने दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
गावपुढारी लागले तयारीला..
ग्रामपंचायत निवडणूकिसाठी दौंड तालुक्यातील विविध गावांत मोठी चुरस पहायला मिळणार आहे. निवडणुकिसाठी इच्छुकांनी कंबर कसली आहे. काहीही झाले तरी यंदा ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात राहिली पाहिजे यासाठी गावपुढारी तयारीला लागले आहेत. तर सोशल मिडीयावर स्वयंघोषित इच्छुकांची भाऊगर्दी पहायला मिळत आहे.