पुणे : पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून विविध गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. पुणे पोलीस विभागातील महिला पोलीस अधिकाऱ्यांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात आयुक्तांकडे धाव घेतली आहे. पुणे शहरातील सहकार नगर पोलीस ठाण्याच्या 11 महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्याविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
महिलांचा छळ : या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी जाणीवपूर्वक कर्मचाऱ्याचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व 11 महिला सहकार नगर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई आणि पोलीस नाईक पदावर कार्यरत आहे. त्यांनी पोलीस निरिक्षक सावळगावकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांना सावळगावकर वारंवार त्रास देतात असे पत्र त्यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहे.
महिला पोलिसांना मानसिक त्रास : तसेच या महिला कर्मचाऱ्यांना सकाळी सहाला आलेल्या कर्मचाऱ्याला रात्री 11 पर्यंत मुद्दामहून थांबून ठेवणे, साप्ताहिक सुट्टी न देणे, मानसिक त्रास देणे, आजारी असतानाही सुट्टी नाकारणे यासारखे कृत्य वारंवार या महिला कर्मचाऱ्यांसोबत केल जाते असल्याचा आरोप या महिला कर्मचाऱ्यांनी केला आहे.
पोलीस आयुक्तांना पत्र : पोलीस अधिकाऱ्यांचे कामही पोलीस ठाण्यातील लोकांकडून करून घेतले जात असल्याचा गंभीर आरोप या 11 महिला कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि डीओच्या चौकशीला कंटाळून या महिला कर्मचारीही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. शहरातील सहकार नगर पोलीस ठाण्यातील 11 महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस निरीक्षक साळगावकर यांच्याविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार केल्याने सर्वत्र चर्चोला उधाण आले आहे. या पोलीस महिलांच्या तक्रारीची पोलीस आयुक्त काय दखल घेतात, यानंतर महिला पोलिसांच्या प्रति असलेली मानसिकता बदलणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा - Mumbai Rains: मुंबईतील मुसळधार पावसानंतर मुख्यमंत्र्यांची सबवे येथे अचानक भेट, अधिकाऱ्यांना दिला 'हा' इशारा