ETV Bharat / state

15 जुलैच्या आसपास 10 वीचा निकाल लागेल - दिनकर पाटील

यावर्षी 10 वीच्या निकालाबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चं माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकतीच नियमावली जाहीर केली आहे. 15 जुलैच्या आसपास 10 वीचा निकाल लागेल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली आहे.

author img

By

Published : Jun 10, 2021, 4:46 PM IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चं माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील

पुणे - कोरोनाच्या पाश्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने 10 वीची परीक्षा रद्द केली आहे. 10 वीचा निकाल कधी लागणार याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही उत्सुकता होती. यंदाचा निकाल कसा असेल, कोणत्या पद्धतीने निकष लावण्यात येणार आहेत, याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकतीच नियमावली जाहीर केली आहे. शाळेतील शिक्षकांना 3 जुलैपर्यंत ठरवून दिलेल्या नियमावलीत विद्यार्थ्यांचे मार्क भरण्याची मुदत देण्यात आली आहे. शाळांनी ही प्रणाली वेळेत भरली, तर 15 जुलैच्या आसपास 10 वीचा निकाल लागेल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चं माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली आहे.

15 जुलैच्या आसपास 10 वीचा निकाल लागेल - दिनकर पाटील

'मूल्यमापनाबाबत विशेष तपशील'

10 वीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर एक मूल्यमापनाची व्यवस्था करण्यात आली असून, त्याद्वारे शाळांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. महामंडळाच्यावतीने परिपत्रक काढून मूल्यमापन कशा पद्धतीने करण्यात येईल याबाबत विशेष तपशील देण्यात आला आहे. पूर्वी गुण हे महामंडळाकडे येत असून, त्यानंतर महामंडळात प्रक्रिया केली जात होती. परंतु, आता मूल्यमापनाची प्रक्रिया बदलल्याने शासनाने नवीन नियम जारी केले आहे. आता मार्गदशन आणि निकाल कशा पद्धतीने जाहीर करायचे याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे.

'कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही'

या वर्षीचा निकाल 9 वी आणि 10 वीवर असल्याने 9 वीच्या निकालाची एक प्रत आणि 10 वीची एक प्रत वेळापत्रकात नमूद करण्यात येणार आहे. भविष्यात विद्यार्थ्यांच्या निकलाबाबत एखादा प्रश्न उदभऊ नये, यासाठी देखील विशेष व्यवस्था करण्यात अली आहे. योग्य नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे, असेही पाटील यावेळी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.