ETV Bharat / state

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या दिंडी सोहळ्याला कलाकारांची मांदियाळी - Natya Sammelan news

100th Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची पिंपरी चिंचवडमधील शोभा यात्रा पार पडली आहे. आज शनिवारी (६ जानेवारी) सकाळी नाट्य दिंडी काढण्यात आली होती. यंदा नाट्य संमेलनाचं 100 वे वर्ष असल्यानं भव्य दिंडी काढण्यात आली होती.

100th Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा दिंडी सोहळा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2024, 6:52 PM IST

पिंपरी/पुणे : 100th Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan : ढोल, ताशा, लेझीम, गुलाबी फेटे, रांगोळ्यांच्या पायघड्यांच्या उपस्थित १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं बिगूल वाजलंय. मोठ्या थाटात नाट्य दिंडी काढण्यात आली. नाट्य कलावंतांसोबत वासुदेव, पिंगळा, पोतराज, गोंधळी, दशावतार या लोककलाकारांच्या लोककलेनं ही नाट्य दिंडी सजली होती. ही दिंडी पाहण्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली. यावेळी नागरिकांना कलाकारांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.

मोरया गोसावी मंदिरापासून दिंडीला सुरूवात : नाट्य संमेलनासाठी उपस्थित असलेल्या लोकांनी नाट्य दिंडीचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. नाट्य दिंडीत अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा पिंपरी- चिंचवडचे उपाध्यक्ष कृष्णकांत गोयल, कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल, ज्येष्ठ पत्रकार आणि समीक्षक श्रीराम खाडिलकर आणि असंख्य नाट्य कलावंत सहभागी झाले होते.

दिमाखदार नाट्य दिंडी : पिंपरी-चिंचवडकरांची शनिवारची सकाळ ढोल, ताशा अनं लेझीमच्या जयघोषात झाली. सकाळच्या वेळी वासुदेव, पिंगळा, गोंधळी, वाघ्या-मुरळी यांच्या सादरीकरणानं नागरिक भारावून गेले होते. ठिकठिकाणी थांबून नागरिकांनी या नाट्य दिंडीचा नयनरम्य सोहळा अनुभवला. नाट्य दिंडी आपल्या दारी असा काहीसा अनुभव या रसिकांनी यावेळी घेतला. नाट्यदिंडीमध्ये अभिनेत्री कविता लाड, तेजश्री प्रधान, सुरेखा कुडची, प्रतीक्षा लोणकर, निर्मिती सावंत, अमृता सुभाष, प्रिया बेर्डे, वर्षा उसगावकर, स्पृहा जोशी, कांचन अधिकारी, शुभांगी गोखले, सुकन्या मोने, सविता मालपेकर तसेच अभिनेता सुशांत शेलार, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, चेतन दळवी, संजय मोने, वैभव मांगले, उमेश कामत, संजय खापरे, सुयश टिळक, पुष्कर श्रोत्री, संदीप पाठक सहभागी झाले होते.

हेही वाचा :

1 महाबळेश्वरमध्ये पर्यटकांचे आरोग्य धोक्यात? अहवालातून 'हा' धक्कादायक निष्कर्ष

2 बिग बॉसमधून अभिषेक कुमार बाहेर? तब्बू होस्ट करणार 'वीकेंड का वार'

3 बांगलादेशात 'द बर्निंग ट्रेन'चा थरार! भारतीय सीमेजवळून जाणाऱ्या ट्रेनच्या चार डब्यांना आग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.