पुणे- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यातच नवी दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझमधील धार्मिक कार्यक्रमातून झालेल्या कोरोनाच्या प्रसारामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. या कार्यक्रमातून पुणे जिल्ह्याच्या शिरुर येथे आलेल्या 10 जणांना शिरुर नगरपरिषदेने मकतब अरबी शिक्षण सेंटर येथे क्वरंटाईन केले होते. मात्र, प्रशासनाला हुल देऊन ते पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
हेही वाचा- 'हिंदू-मुसलमान' खेळ मांडणाऱ्यांच्या हाती आयते कोलीत!
पळून गेलेल्या दहा जणांवर शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मागील महिनाभरापूर्वी 10 जण दिल्ली येथून पुणे जिल्ह्याच्या शिरुर येथे आले होते. परंतु, देश लॉकडाऊन झाला आणि हे सर्व नागरिक शिरूर शहरात अडकले. त्यावेळी त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र, प्रशासनाला हुल देऊन शिरूर वरुन दिल्लीला एका मालवाहतूक ट्रकमध्ये बसून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.