ETV Bharat / state

Cheating in Pune : अजित पवारांच्या पीएसोबत ओळख असल्याचे सांगत 10 लाख रुपयांची फसवणूक; पुण्यात आरोपीला अटक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पीएसोबत ( Ajit Pawar PA ) ओळख असल्याचे सांगून पुण्यातील वारजे भागात राहणाऱ्या एकाची १० लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ( Cheating by using Ajit Pawar Name Pune ) याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( bund garden police station )

author img

By

Published : Mar 2, 2022, 12:01 PM IST

Updated : Mar 2, 2022, 6:41 PM IST

ajit pawar
ajit pawar

पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पीएसोबत ( Ajit Pawar PA ) ओळख असल्याचे सांगून पुण्यातील वारजे भागात राहणाऱ्या एकाची १० लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Bund garden police station ) प्रविण विठ्ठल जगताप रा. वाई सातारा आणि एक अनोळखी अशी दोन आरोपींची नावे आहेत. ( Cheating by using Ajit Pawar Name Pune ) त्यातील प्रवीण विठ्ठल जगताप यास अटक करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यकांचे नाव सांगून जमीन व्यवहारात फसवणूक केल्याची घटना ताजी आहे. मात्र, असे असतानाच आता पुन्हा अशीच एक घटना घडली आहे.

डीसीपी श्रीनिवास घाडगे याबाबत बोलताना

अशी केली फसवणूक -

पुणे महापालिकेमार्फत विविध विकास कामे केली जातात. त्यापैकी ५ कोटी रुपयांचे बजेट लॉकिंग करून देतो, माझी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए मुसळे यांच्याशी ओळख आहे. तुमचे काम होऊन जाईल, असे आरोपीने फिर्यादी महेश पटवर्धन याला सांगितले होते. त्यावर महेश पटवर्धन यांनी विश्वास ठेवला. त्यानंतर पटवर्धन यांने आरोपीला १० लाख रुपये दिले आहे. पण तो काही काम करत नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानंतर आरोपी प्रवीण जगताप याला अटक केली आहे. अधिक तपास सुरू असल्याचे बंडगार्डन पोलिसांनी सांगितले.

10 Lakh Cheating by Using Deputy Cm Ajit Pawar Name Pune, case filed against two in bund garden police station
आरोपी

हेही वाचा - Disha Salian Death Case : नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ, मालवणी पोलिसांचं समन्स, नितेश राणेंचाही जबाब नोंदवणार

Last Updated : Mar 2, 2022, 6:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.