पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एका कोरोनाग्रस्त रुग्णाला उपाचारानंतर सुट्टी मिळाली आहे. गेल्या १४ दिवसांपासून त्याच्यावर भोसरीमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर आरोग्य प्रशासनाकडून सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरात आता केवळ दोनच व्यक्ती हे कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अमेरिकेहून आलेल्या ३५ वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणूची बाधा असल्याचे समोर आले होते. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर भोसरी येथील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते. रुग्णाची प्रकृती स्थिर होती. १४ दिवसांच्या कोरोना संबंधी चाचण्यांनंतर सदर रुग्णाचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने बुधवारी रात्री नऊच्या सुमारास त्याला सुट्टी देण्यात आली. दरम्यान, शहरात ऐकून १२ कोरोना बाधित होते, त्यापैकी १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांची प्रकृती उत्तम आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. त्याचबरोबर, सुट्टी देण्यात आलेल्या व्यक्तीला २ आठवडे विलगीकरणात राहण्याचे सांगण्यात आले आहे. असे असले तरी कोणीही गाफिल राहून चालणार नाही. प्रत्येकाने स्व:ताची व इतरांची काळजी घेत लॉकडाउन दरम्यान प्रशासनाला सहकार्य करत घरीच थांबावे.
हेही वाचा- जुन्नर तालुक्यात एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण