ETV Bharat / state

ट्रक आणि टेम्पोमध्ये धडक; मुलाचा मृत्यू, वडील गंभीर जखमी - death in accident

हे दोघे पिता-पुत्र आयशर टेम्पोने (एम एच १४ जि.यू .९५५४) चिखलीमधून पेपर रोल घेवून जळगावच्या दिशेने महामार्गावरून जात होते. याचवेळी समोरून आलेल्या ट्रकची (आर. जे. ०९ जी बी ५३०३) टेम्पोला जोरदार धडक बसल्याने ही दूर्घटना घडली.

accident
ट्रक आणि टेम्पोमध्ये धडक; मुलाचा मृत्यू, वडील गंभीर जखमी
author img

By

Published : Feb 17, 2020, 8:00 PM IST

Updated : Feb 17, 2020, 8:08 PM IST

पुणे - कळंब येथे ट्रक आणि टेम्पोमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. पुणे-नाशिक महामार्गावरील या अपघातात टेम्पो चालक राजकुमार आहेरकर (वय ३३) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे वडील जगन्नाथ आहेरकर गंभीर जखमी झाले आहेत.

हे दोघे पिता-पुत्र आयशर टेम्पोने (एम एच १४ जि.यू .९५५४) चिखलीमधून पेपर रोल घेवून जळगावच्या दिशेने महामार्गावरून जात होते. याचवेळी समोरून आलेल्या ट्रकची (आर. जे. ०९ जी बी ५३०३) टेम्पोला जोरदार धडक बसल्याने ही दूर्घटना घडली. स्थानिकांनी तत्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्यापूर्वीच राजकुमार आहेरकर यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. जगन्नाथ आहेरकर यांच्या पायाला आणि मानेला गंभीर जखमा झाल्या असून त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - गडचिरोली पोलिसांचा नक्षलवाद्यांच्या तळावर हल्ला; 1 नक्षलवादी ठार

अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. त्याच्या विरोधात मंचर पोलिसांनी वाहन निष्काळजीपणे चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात टेम्पोचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Last Updated : Feb 17, 2020, 8:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.