ETV Bharat / state

मुंबईहून परभणीत आलेली महिला कोरोनाबाधित; रुग्णसंख्या 5 वर - woman came from mumbai corona positive

रविवारी आढळून आलेली 50 वर्षीय महिला मुंबईतील गोरेगाव येथून नातेवाईकांसह 5 दिवसांपूर्वी परभणीत आली आहे. तिचा तपासणी अहवाल सकाळी प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

parbhani district hospital
परभणी जिल्हा रुग्णालय
author img

By

Published : May 17, 2020, 1:03 PM IST

परभणी- अनेक दिवस ग्रीन झोन मध्ये राहणाऱ्या परभणी जिल्ह्यात अचानक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. रविवारी सकाळी 10.30 वाजता प्राप्त झालेल्या अहवालात मुंबई येथून आलेली एक महिला कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार परभणीत आता कोरोनाबाधितांची संख्या 5 वर गेली असून, त्यापैकी एकजण बरा होऊन घरी परतला आहे. तर चार जणांवर जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात उपचार सुरू आहेत.

रविवारी आढळून आलेली 50 वर्षीय महिला मुंबईतील गोरेगाव येथून नातेवाईकांसह 5 दिवसांपूर्वी परभणीत आली आहे. तिचा तपासणी अहवाल सकाळी प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. 5 दिवसांपूर्वी मुंबईतील गोरेगाव येथून एका टेम्पोने महिला कुटुंबियांसह परभणीत दाखल झाली. टेम्पोमध्ये 6 ते 7 जण असल्याची माहिती मिळाली आहे.

महिलेला त्रास होत असल्याने 2 दिवसांपूर्वी ती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाली होती. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून या महिलेचे स्वॅब घेऊन ते नांदेड येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. त्याचा अहवाल रविवारी सकाळी प्रशासनास प्राप्त झाला. त्यात सदरील महिला पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आता या महिलेच्या संपर्कातील व्यक्तींना ताब्यात घेण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे.

दरम्यान, यापूर्वी देखील मुंबई येथून एक कुटुंब परभणीत आले असता, त्या कुटुंबातील एक महिला आणि तिची दोन मुले कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर देखील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.