ETV Bharat / state

परभणीकरांसाठी खुशखबर; निम्न-दुधनातून उद्या सुटणार पाणी, नदीकाठी सतर्कतेचा इशारा - water lower dudhna

निम्न-दुधना प्रकल्पातून उद्या शनिवारी दुपारी ४ वाजता १५ द.ल.घ.मी पाणी परभणीसाठी सोडण्यात येणार आहे. हे पाणी दूधना तथा पूर्णा नदीच्या पात्रातून वाहणार असल्याने या नदीकाठच्या ग्रामस्थांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

निम्न-दुधना प्रकल्प
author img

By

Published : May 31, 2019, 7:47 PM IST

परभणी - ज्या निम्न-दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्यावरून परभणी आणि जालना जिल्ह्यात राजकारण पेटले होते. अखेर त्याच प्रकल्पातून उद्या शनिवारी दुपारी ४ वाजता १५ द.ल.घ.मी पाणी परभणीसाठी सोडण्यात येणार आहे. हे पाणी दूधना तथा पूर्णा नदीच्या पात्रातून वाहणार असल्याने या नदीकाठच्या ग्रामस्थांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

निम्न-दुधना प्रकल्प

सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मदार दुधना प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून असून जिल्ह्यातून वाहणारी दुधना-पूर्णा नदी अक्षरश: कोरडी ठाक पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रचंड पाणीटंचाई लक्षात घेऊन परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी निम्न-दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. या प्रकरणी परभणीचे माजी पालकमंत्री तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लोअर दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा केला होता.

या मागणीनंतर राज्य शासनाने विभागीय आयुक्तांना पाणी सोडण्याचे आदेशही दिले. त्याप्रमाणे १५ मे रोजीच हे पाणी परभणीला सोडण्यात येणार होते. परंतु, त्यापूर्वीच जालन्यातील आमदार तथा पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, काँग्रेसचे माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी प्रकल्पातून परभणीसाठी पाणी सोडण्यास विरोध केला. परतुर तालुक्याला पाणी कमी पडेल, असे कारण देत विभागीय आयुक्तांना पाणी न सोडण्याचे निवेदन देत आंदोलन केले. प्रकल्पावर जाऊन काही कार्यकर्त्यांनी जलसमाधी घेण्याचाही प्रयत्न केला होता.

दरम्यान, ८५ टीएमसी एवढे पाणी असलेल्या निम्न दुधना प्रकल्पातून परभणीला केवळ १५ टीएमसी पाणी सोडायचे आहे. त्याला देखील जालना विरोध करत असल्याने परभणीतील सामान्य नागरिक संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्वतः प्रकल्पाची पाहणी करून आढावा घेतला होता. त्यानंतर हे पाणी सोडण्याचा निर्णय झाला आणि त्याप्रमाणे शनिवारी पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती प्रकल्पाचे अधिकारी सतीश बागल यांनी दिली आहे.

या पार्श्वभूमीवर निम्न दुधना नदीकाठच्या ग्रामस्थांनी नदीपात्रात जाऊ नये, तसेच ज्या शेतकऱ्यांनी किंवा इतर व्यक्तीस निम्न-दुधना नदीच्या पात्रात पशुधन किंवा इतर साहित्य ठेवलेले असेल ते तात्काळ काढुन घ्यावे. निम्न दुधना नदीपात्रातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा उपसा विद्युत मोटारीद्वारे कोणीही करु नये, असे आवाहन परभणीचे निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी केले आहे.

Intro:परभणी - ज्या निम्न-दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्यावरून परभणी आणि जालना जिल्ह्यात राजकारण पेटले होते, अखेर त्याच प्रकल्पातून उद्या शनिवारी दुपारी चार वाजता 15 दलघमी पाणी सोडण्यात येणार आहेे. हे पाणी दूधना तथा पूर्णा नदीच्या पात्रातून वाहणार असल्याने या नदी काठच्या ग्रामस्थांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.Body:सध्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मदार दुधना प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून असून जिल्ह्यातून वाहणारी दुधना-पूर्णा नदी अक्षरश: कोरडेठाक पडली आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील प्रचंड पाणीटंचाई लक्षात घेऊन परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी लोअर-दुधना प्रकल्पातून परभणीसाठी पाणी सोडण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. सोबतच पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. या प्रकरणी परभणीचे माजी पालकमंत्री तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लोअर दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा केला होता. त्यानुसार राज्य शासनाने विभागीय आयुक्तांना पाणी सोडण्याचे आदेशही दिले. त्याप्रमाणे 15 मे रोजीच हे पाणी परभणीकडे झेपावणार होते आहे. परंतु त्यापूर्वीच जालन्यातील आमदार तथा पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, काँग्रेसचे माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी प्रकल्पातून परभणीसाठी पाणी सोडण्यास विरोध केला आहे. परतुर तालुक्याला पाणी कमी पडेल, असे कारण देत विभागीय आयुक्तांना पाणी न सोडण्याचे निवेदन देत आंदोलन केले. प्रकल्पावर जाऊन काही कार्यकर्त्यांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, 85 टीएमसी एवढे पाणी असलेल्या लोअर दुधना प्रकल्पातून परभणीला केवळ 15 टीएमसी पाणी सोडायचे आहे. त्याला देखील जालनेकर विरोध करत असल्याने परभणीतील सामान्य नागरिक संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्वतः प्रकल्पाची पाहणी करून आढावा घेतला होता. त्यानंतर हे पाणी सोडण्याचा निर्णय झाला आणि त्याप्रमाणे शनिवारी पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती प्रकल्पाचे अधिकारी सतीश बागल यांनी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर निम्न दुधना नदीकाठच्या ग्रामस्थांनी नदीपात्रात जाऊ नये, तसेच ज्या शेतकऱ्यांनी किंवा इतर व्यक्तीस निम्न-दुधना नदीच्या पात्रात पशुधन किंवा इतर साहित्य ठेवलेले असेल ते तात्काळ काढुन घ्यावे. निम्न दुधना नदीपात्रातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा उपसा विद्युत मोटारीद्वारे कोणीही करु नये, असे आवाहन परभणीचे निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी केले आहे.
- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- loar_dudhana_project_vis_with_voConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.