ETV Bharat / state

परभणीत रात्रभर धुवाधार; नद्यांच्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला, निम्न दुधनातून पाण्याचा विसर्ग - water relised from nimn dudhana

मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे या नद्यांना पूर आला होता. त्यामुळे आठ ते दहा गावांचा संपर्क तुटला होता. अशीच परिस्थिती आज उद्भवली आहे. बुधवारी दुपारपासून परभणी जिल्ह्यात पावसाची बॅटिग सुरू आहे. मध्यरात्री त्यात प्रचंड वाढ झाली. त्यामुळे पालम तालुक्यातील या दोन्ही प्रमुख नद्यांचे पाणी नदी पात्र सोडून दोन हेक्‍टर क्षेत्रावर वाहत आहेत.

परभणीत रात्रभर धुवाधार
परभणीत रात्रभर धुवाधार
author img

By

Published : Jul 22, 2021, 12:44 PM IST

परभणी - जिल्ह्यात बुधवारी रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे पालम आणि मानवत तालुक्यातील नद्यांना पूर आला आहे. परिणामी या नद्यांच्या खोऱ्यातील सुमारे १५ ते २० गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील दुधना, गलाटी आणि लेंडी नदीला देखील मोठ्या प्रमाणात पूर आला असून या नद्यांचे पाणी पात्राबाहेर २ किलोमीटर पर्यंतच्या शेतशिवारांमध्ये पसरले आहे. यामुळे खरिपाचे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

परभणीत रात्रभर धुवाधार

आठवड्यात दुसर्‍यांदा गावांचा संपर्क तुटला -

पालम तालुक्यातून गोदावरीसह गलाटी आणि लेंडी या दोन प्रमुख नद्या वाहतात. त्यापैकी गोदावरी नदीचे पात्र मोठे असल्याने या नदीला अजूनपर्यंत पूर आलेला नाही. मात्र, गलाटी आणि लेंडी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. विशेष म्हणजे मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे या नद्यांना पूर आला होता. त्यामुळे आठ ते दहा गावांचा संपर्क तुटला होता. अशीच परिस्थिती आज उद्भवली आहे. बुधवारी दुपारपासून परभणी जिल्ह्यात पावसाची बॅटिग सुरू आहे. मध्यरात्री त्यात प्रचंड वाढ झाली. त्यामुळे पालम तालुक्यातील या दोन्ही प्रमुख नद्यांचे पाणी नदी पात्र सोडून दोन हेक्‍टर क्षेत्रावर वाहत आहेत. त्यात हजारो हेक्टर खालील पिके पाण्याखाली गेली आहेत.

परभणीत रात्रभर धुवाधार
परभणीत रात्रभर धुवाधार
या गावांचा तुटला संपर्क -दरम्यान, लेंडी नदीला आलेल्या पुरामुळे पुयनी, आडगाव, तेलजापूर, आरखेड, घोडा, सोमेश्वर, फळा, फरकंडा या नदी काठावरील गावांचा पालमशी संपर्क तुटला आहे. तर गलाटी नदीच्या पुरामुळे सायाळा, धनेवाडी, कुरणेवाडी, उमरथडी या गावांचा पालमशी संपर्क तुटला आहे.मानवत तालुक्यातील दुधना नदीला पूर -

मानवत तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरू असून सभोवतालचे नदी नाले ओढे देखील ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे दुधना नदीला पूर येऊन मानवत तालुक्यातील मगर सावंगी या गावचा संपर्क तुटला आहे. तसेच पाथरी-परभणी महामार्गावरील किन्होळा पाटीजवळ असलेला वळण रस्ता पाण्याखाली गेल्याने महामार्गावरील वाहतूक सकाळी अकरा वाजेपर्यंत ठप्प झाली होती.

परभणीत रात्रभर धुवाधार
परभणीत रात्रभर धुवाधार
निम्न-दुधना प्रकल्पाचे चार दरवाजे उघडले -सेलू तालुक्यातील निम्न-दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने प्रकल्पात पाण्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे बुधवारी रात्री उशिरा या प्रकल्पाचे चार दरवाजे उघडून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हे दरवाजे ०.३० इस मीटरने उघडले असून, ४ हजार १६४ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. ज्यामुळे मोरेगाव आणि राजावाडी येथील पुलावरून पाणी वाहण्याची शक्यता असल्याने वाहतूक बंद होऊ शकते.परभणी परिसरात १११ मिलिमीटर पाऊसबुधवारी दुपारी ३ वाजल्यापासून परभणी शहर आणि परिसरात धुवांधार पाऊस होत असून, या पावसाची नोंद आज सकाळी ८ वाजता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागात तब्बल १११ मिलिमीटर एवढी झाली आहे. ज्यामुळे परभणी आणि परिसरात अतिवृष्टी झाल्याचे दिसून येते. परिणामी तालुक्यातील सिंगणापूर, तरोडा, बोरवंड, ताडपांगरी, पोखर्णी, दैठणा, इंदेवाडी, भारसवाडा, पेगरगव्हाण, पिंपरी, उजलांबा आदी गावांमधील शेत शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तसेच परभणी शहरातील पिंगळगडनाला शेजारील शांतीनिकेतन कॉलनी, साखला प्‍लॉट तसेच इतर सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. अनेक घरांमध्ये देखील पाणी शिरले आहे. शहरातील मुख्य रस्ते देखील पाण्याखाली आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.