ETV Bharat / state

मराठवाड्यात अवकाळी पावसाचा ३ मेपर्यंत मुक्काम; 'पिकांची काळजी घेण्याची गरज'

author img

By

Published : Apr 30, 2021, 10:05 AM IST

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज (२९ एप्रिल रोजी) औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. या दरम्यान वाऱ्याचा वेग (ताशी ३० ते ४० किलोमीटर) राहून पावसाची शक्यता आहे. तर ३० एप्रिल रोजी मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट होवून पावसाची शक्यता आहे.

कृषी हवामान सेवा, Untimely rain in parbhani
कृषी हवामान सेवा

परभणी - मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड यासह जालना, उस्मानाबाद व लातूर या जिल्ह्यांमध्ये आजच्यासह पुढील ५ दिवस कमी अधिक प्रमाणात सोसाट्याच्या वार्‍यासह विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी हवामान सेवा विभागाच्यावतीने हा अंदाज वर्तविण्यात आला असून, विभाग प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी शेतकऱ्यांना पीक संरक्षणासाठी काही सल्ले दिले आहेत.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज (२९ एप्रिल रोजी) औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. या दरम्यान वाऱ्याचा वेग (ताशी ३० ते ४० किलोमीटर) राहून पावसाची शक्यता आहे. तर ३० एप्रिल रोजी मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट होवून पावसाची शक्यता आहे. (वाऱ्याचा वेग- ताशी ३० ते ४० किलोमीटर) या प्रमाणेच १ व २ मे रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाट पावसाची शक्यता आहे. तसेच ३ मे रोजी उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट होऊन पावसाची शक्यता असल्याची माहिती डॉ. डाखोरे यांनी दिली.

माहिती देतांना संतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विभाग प्रमुख डॉ. कैलास डाखोरे..

यापूर्वीही वर्तवला होता अंदाज -

दरम्यान, यापूर्वी प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात 27 एप्रिल रोजी बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, हलक्या स्वरूपात पाऊस तसेच तुरळक ‍ठिकाणी गारपीट झाली. तसेच 28 एप्रिल रोजी देखील परभणी, उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व हलक्या स्वरूपात पावसाने हजेरी लावली.

हवामान आधारीत कृषि सल्ला; पीक व्‍यवस्‍थापन -

ऊस पिकात खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 टक्के म्हणजेच 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5 टक्के (4 मिली प्रति 10 लीटर) पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. सध्‍याच्‍या काळात उशीरा लागवड केलेल्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसाची तसेच गारपीटीची शक्यता असल्यामुळे, हळदीची उघड्यावर साठवण करू नये.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन -

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसाची तसेच गारपीटीची शक्यता असल्यामुळे, नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना काठीचा आधार द्यावा. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसाची तसेच गारपीटीची शक्यता असल्यामुळे, नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना काठीचा आधार द्यावा. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसाची तसेच गारपीटीची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून घ्यावी. वाऱ्याचा वेग लक्षात घेता नवीन लागवड केलेल्या झाडांना काठीचा आधार द्यावा.

उन्हाळी हंगामासाठी लागवड केलेल्या भाजीपाला पिकात पाण्‍याचा ताण बसणार नाही, याची दक्षता घ्‍यावी. काढणीस तयार असलेल्या कांदा ‍पिकाची काढणी करावी.

भाजीपाला -

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी.

फुलशेती व्‍यवस्‍थापन -

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी व प्रतवारी करून, ती बाजारपेठेत विक्रीस पाठवावी.

पशुधन व्‍यवस्‍थापन -

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघड्यावर सोडू किंवा बांधू नये. निवाऱ्याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत, याची काळजी घ्‍यावी. जनावरांच्‍या गोठ्याच्‍या छतावर ऊसाचे पाचट किंवा तुराट्याचे आच्‍छादन करावे. तसेच पाऊस चालू होण्‍याच्‍या वेळी झाडाच्‍या आडोशाला थांबु नये.

चारा पिके -

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणी केलेल्‍या ज्‍वारीचा कडबा पावसात भिजणार नाही, याची दक्षता घ्‍यावी. कारण पावसात भिजल्‍यास त्‍याची प्रत खालावून साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.