ETV Bharat / state

परभणीत दुचाकी चोरट्यांना अटक; 32 दुचाक्या जप्त - Dilip Ghogre arrested Parbhani

परभणी पोलीस दलाच्या विशेष पथकाने आज मोठी कारवाई करत 32 दुचाक्या जप्त केल्या आहेत. गुप्त माहितीवरून परभणी शहरातील ईदगाह मैदानाजवळ सापळा रचून आरोपींना अटक करण्यात आली.

Two-wheeler thief arrested in Parbhani
दुचाकी चोरटे अटक परभणी
author img

By

Published : Jan 21, 2021, 6:50 PM IST

परभणी - परभणी पोलीस दलाच्या विशेष पथकाने आज मोठी कारवाई करत 32 दुचाक्या जप्त केल्या आहेत. गुप्त माहितीवरून परभणी शहरातील ईदगाह मैदानाजवळ सापळा रचून आरोपींना अटक करण्यात आली. चोरट्यांनी परभणीसह पुणे, नगर, नांदेड आदी भागातून दुचाक्या चोरून त्या विविध लोकांना विक्री केल्या होत्या. पोलिसांच्या या कारवाईमुळे दुचाकी चोरट्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

माहिती देताना पोलीस अधीक्षक जयंत मीना

हेही वाचा - परभणी: बर्ड फ्लू प्रभावीत परिसर 90 दिवसांपर्यंत राहणार प्रतिबंधित

अशी केली कारवाई -

या संदर्भात परभणी पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी परभणी शहरात पेट्रोलींग करत असताना चार व्यक्ती परभणी शहरातील इदगाह मैदान (जिंतूर रोड) येथे दोन दुचाकी घेवून विक्री करण्यासाठी येणार असल्याचे समजले. या माहितीवरून पोलिसांनी ईदगाह मैदान येथे सापळा रचला. त्या ठिकाणी 2 मोटरसायकलसह 2 जण शारदा महाविद्यालयाच्या पाठीमागील भिंतीच्या जवळ येवून थांबले असता पोलिसांनी त्यांना शिताफीने ताब्यात घेवून त्यांच्या ताब्यातील दुचाकींबाबत विचारणा केली. यावर दोघांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्या दोघांनी दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना पकडून त्यांच्या इतर दोन साथीदारांबद्दल देखील माहिती घेऊन त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले.

सर्व आरोपी पाथरी तालुक्यातील -

दरम्यान पकडण्यात आलेले चारही आरोपी पाथरी तालुक्यातील असून यामध्ये दिलीप घोगरे (वय १९ रा. रेनाखळी ता.पाथरी), विशाल रमेश इंगळे (वय २१ रा. रेनाखळी ता.पाथरी), शाम नामदेव हरकळ (वय २१ रा. रेनाखळी ता.पाथरी) व कैलास बाबासाहेब शेळके (वय २० रा. उमरा ता. पाथरी) यांचा समावेश आहे. चारही जणांना विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता, त्या चौघांनी मिळूण एकूण ३२ दुचाक्या चोरल्याची कबुली दिली. या दुचाक्या रेनाखळी येथील शाम हरकळ यांच्या शेतातून जप्त करण्यात आल्या. दुचाक्या परभणी जिल्ह्यासह जालना, बीड, नांदेड, अहमदनगर, पुणे या ठिकाणांहून चोरून आणल्याचे देखील पोलीस तपासात उघड झाले आहे.

यांनी बजावली कामगिरी -

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक जयंत मीना, अपर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, परिवेक्षाधिन पोलीस उप अधीक्षक बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि चंद्रकांत पवार व विश्वास खोले, कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, जमीरोद्यीन फारुखी, यशवंत वाघमारे आदींनी केली.

शहरात आणखी सीसीटीव्ही कॅमेरे वाढवणार -

दरम्यान, शहरातील घडणार्‍या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यानुसार शहरात सध्या मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे बसविण्यात आले आहेत. त्यात आणखी वाढ करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी दिली. तसेच, चोरीला गेलेल्या दुचाक्यांसंदर्भात कुठल्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत, आणि त्या कोणाच्या आहेत याचा तपास सुरू आहे. त्यानुसार संबंधित दुचाकी मालकांना त्या गाड्या परत केल्या जाणार आहेत. तसेच, नागरिकांनी देखील आपल्या मालमत्तांचे संरक्षण करण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन मीना यांनी माध्यमांशी बोलताना केले.

हेही वाचा - परभणी: 498 ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर, प्रमुख पक्षांकडून बहुमताचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.