ETV Bharat / state

परभणीत दोघांची आत्महत्या; एकाने मुल होत नसल्याने तर दुसऱ्याने आजाराला कंटाळून संपवले जीवन - परभणी आत्महत्या न्यूज

परभणीतील साडेगाव येथील तरुणाने मुल होत नसल्याने नैराश्यातुन विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली आहे. तर झरी येथील एका व्यक्तीने आजाराला कंटाळून जीवन संपवले. या दोन्ही प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

two person commited suicide in parbhani
परभणीत दोघांची आत्महत्या; एकाने मुल होत नसल्याने तर दुसऱ्याने आजाराला कंटाळुन संपवले जीवन
author img

By

Published : Sep 3, 2020, 6:51 AM IST

परभणी - तालुक्यातील दोन ठिकाणी आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या आहे. पहिल्या घटनेत साडेगाव येथील तरुणाने मुल होत नसल्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली, तर दुसऱ्या घटनेत झरी येथील व्यक्तीने यकृताच्या आजाराला कंटाळून जीवन संपवले. या दोन्ही प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

साडेगाव येथील तरुणाच्या लग्नाला अनेक वर्षे झाले तरी मुल होत नव्हते. याच नैराश्यातून त्याने विषारी औषध पिल्याचे सांगण्यात येत आहे. माणिक गणेशराव मोरे (वय 33) असे या मृत तरुणाचे नाव आहे. तो सतत तणावात राहत होता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली. याच तणावातून त्याने बुधवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास विषारी औषध पिले, त्याला तात्काळ परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याबाबत त्याचे काका दौलत शंकरराव मोरे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा - आईच्या सांगण्यावरुनच 'त्या' युवकाचा खून; खिंडवाडीजवळील बेवारस मृतदेहाचे गूढ उकलले

दुसऱ्या घटनेत, झरी येथील रमेश निवृत्ती भोकरे यांनी यकृताच्या आजाराला कंटाळून जीवन संपवले. गेल्या काही वर्षांपासून त्यांचे यकृत खराब झाल्याने ते त्रस्त होते. मात्र, उपचार घेऊनही तब्येतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे याच तणावातुन त्यांनी बुधवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान, या प्रकरणी शंकर निवृत्ती भोकरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.