ETV Bharat / state

Trolley Accident : ऊसाची ट्रॉली घरावर उलटल्याने आजीसह नातीचा मृत्यू - परभणीत ऊसाची ट्रॉली घरावर कोसळली

तालुक्यातील बाभळगाव येथून माजलगाव येथील साखर कारखान्याकडे एक ट्रॅक्टर ऊस घेऊन जात होता. संबंधित कुटुंब मंगळवारी पहाटे गाढ झोपेत असताना ऊसाने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली त्यांच्या घरावर उलटली. यात दोघींचा मृत्यू झाला.

अपघात स्थळावरील चित्र
अपघात स्थळावरील चित्र
author img

By

Published : Nov 30, 2021, 3:51 PM IST

परभणी - ऊसाने भरलेली ट्रॉली रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या घरावर पलटली. ज्यामुळे ५५ वर्षीय आजीसह नातीचा ऊसाच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. ही घटना काल (मंगळवार) पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथे घडली. पारुबाई रंगनाथ पवार (वय ५५ वर्ष), शिवानी संजय जाधव (वय ८ वर्ष) अशी मृतकांची नावे आहेत. तालुक्यातील बाभळगाव येथून माजलगाव येथील साखर कारखान्याकडे एक ट्रॅक्टर ऊस घेऊन जात होता. संबंधित कुटुंब मंगळवारी पहाटे गाढ झोपेत असताना ऊसाने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली त्यांच्या घरावर उलटली. यात दोघींचा मृत्यू झाला.

एक महिला सुदैवाने बचावली

दरम्यान, गावकऱ्यांनी तत्काळ घरावर पडलेल्या ऊसाच्या मोळ्या बाजूला काढल्या. मात्र, तोपर्यंत पारुबाई पवार यांचा मृत्यू झाला होता. तर नात शिवानी जाधव गंभीर स्थितीत आढळून आली. तिला तत्काळ उपचारासाठी परभणीत हलविण्यात आले. मात्र तिचा देखील उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची मिळाली. विशेष म्हणजे घरामध्ये पलंगाच्या बाजूला झोपलेली पुष्पा पवार ही महिला मात्र, सुदैवाने बचावली आहे.

हेही वाचा - उल्हासनगर पोलीस ऍक्शन मोडवर; आरोपींची काढली वरात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.