ETV Bharat / state

परभणीत इंधनाचा सर्वाधिक दर; पेट्रोल 102.57 तर डिझेल 93.4 रुपये प्रतिलिटर

परभणीत पेट्रोल 102.57 पैसे प्रति लिटर एवढ्या दराने विक्री होत असून, डिझेल देखील शंभरीच्या दिशेने वाटचाल करत आहे.

fuel
इंधन
author img

By

Published : May 29, 2021, 3:26 PM IST

Updated : May 29, 2021, 5:05 PM IST

परभणी - गेल्या काही दिवसात इंधनाचे दर पुन्हा एकदा भडकले असून, त्यात परभणीतील उच्चांकी दरामुळे या ठिकाणचे वाहनधारक संताप व्यक्त करत आहेत. परभणीत पेट्रोल 102.57 पैसे प्रति लिटर एवढ्या दराने विक्री होत असून, डिझेल देखील शंभरीच्या दिशेने वाटचाल करत आहे. डिझेलचा दर 93.4 पैसे एवढा झाला. तर पावर पेट्रोल 105 रुपयांच्या पुढे विक्री होत आहे. दरम्यान, परभणीत गेल्या वर्षभरात पेट्रोल 24 रुपयांनी तर डिझेल 25 रुपयांनी महागले आहे.

परभणीत इंधनाचा सर्वाधिक दर

दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत परभणीने रेकॉर्ड कायम ठेवला आहे. राज्यातीलच नव्हे तर कदाचित देशातील सर्वात महाग पेट्रोल सध्या परभणीकारांना घ्यावे लागत आहे. 'जगात जर्मनी आणि भारतात परभणी' या म्हनी प्रमाणे पुन्हा एकदा परभणी इंधनाच्या रेकॉर्डब्रेक किंमतीमुळे चर्चेत आली आहे. परभणी शहरात आज शनिवारी पावर पेट्रोल तब्बल 105 रुपये 22 पैसे प्रति लिटर दराने विक्री होत आहे. तर साधे पेट्रोल 102.57 पैसे दराने विकल्या जात आहे. तसेच डिझेलच्या दराचा सुध्दा भडका उडाला असून, डिझेल 93.04 पैसे प्रतिलिटर प्रमाणे परभणीकर खरेदी करत असल्याने त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

हेही वाचा - रत्नागिरीतील समुद्रात सापडला तब्बल १५० किलोचा मासा, बघण्यासाठी लोकांची गर्दी

वर्षभरात पेट्रोल 24 रुपयांनी महागले -

विशेष म्हणजे गतवर्षी मे महिन्यातच परभणीत पेट्रोलचे दर 78 रुपये 35 पैसे प्रति लिटर एवढे होते, तर 30 ऑक्टोंबर अर्थात सहा महिन्यापूर्वी 90 रुपये आणि तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच 30 जानेवारीला 95 रुपये 21 पैसे आणि 30 मार्च रोजी 99 रुपये 8 पैसे प्रति लिटर दराने विक्री झाले आहे. त्यानंतर मे महिन्यात हा दर शंभरी च्या वर गेला. त्यानुसार काल शुक्रवारी (28 मे रोजी) 102. 32 पैसे प्रति लिटर झाला, तर आज (शनिवारी) त्यात वाढ झाली असून, 102 रुपये 57 पैसे प्रति लिटर दराने पेट्रोल ग्राहकांना खरेदी करावे लागत आहे.

डिझेलमध्येही 25 रुपयांची वाढ -

पेट्रोल प्रमाणात डिझेल ही शंभरी च्या वाटेवर आहे. डिझेल मध्ये देखील गेल्या वर्षभरात तब्बल 25 रुपयांची वाढ झाली आहे. गतवर्षी 7 मे रोजी परभणीत डिझेल 67 रुपये 17 पैसे तर सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच 30 ऑक्टोंबर रोजी 77 रुपये 80 पैसे एवढ्या दराने विक्री झाले. शिवाय तीन महिन्यापूर्वी म्हणजे 30 जानेवारी रोजी डिझेलचा दर 84 रुपये 3 पैसे तर 30 मार्च रोजी 88 रुपये 64 पैसे एवढा झाला होता. यात पुन्हा वाढ होऊन काल (शुक्रवारी) 92.75 पैसे एवढ्या दराने डिझेलची विक्री झाली, तर आज (शनिवारी) त्यात आणखी 29 पैशांची वाढ होऊन हाच दर 93 रुपये 4 पैसे एवढा झाला आहे.

सर्वाधिक दराचा परभणीकरांनाच फटका का?

गेल्या काही दिवसात देशात इंधनाचे भाव झपाट्याने वाढत आहेत. मात्र, त्यातील सर्वाधिक भाव परभणीत असल्याने नागरिक सवाल उपस्थित करू लागले आहेत. या बाबत शहरातील एका पंपावर लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या. तेव्हा हा भावाढीचा अन्याय केवळ आमच्यावरच का ? असा सवाल वाहनधारक उपस्थित करत आहेत. सध्या लॉकडाऊनची परिस्थिती आहे. लोकांना आधीच रोजगार नाही, त्यात इंधन दरवाढीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सहन करावी लागत आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - 'आपण नर्कात जगत असून आम्ही हतबल आहोत' - दिल्ली हायकोर्टानं व्यक्त केली नाराजी

डिझेल दरवाढीने मालवाहतूक महागली -

पेट्रोल प्रमाणेच डिझेलच्या भावात (93.4 पैसे) देखील वाढ झाली आहे. त्यामुळे मालवाहतूक महागली आहे. भाजीपाला, धान्य यांची दरवाढ सुरू झाली आहे. भाज्या महागल्या. धान्याचे दरही वाढले. बहुतांश प्रवासी आणि मालवाहू ऑटोरिक्षा, टेम्पो, ट्रक पेट्रोल व डिझेलवर चालतात. त्यामुळे प्रवाशी वाहतुकी बरोबरच माल वाहतुकीचा खर्च वाढला आहे. याचा वाहतुक, दळणवळण, व्यापारी आणि प्रवास या सर्वावर विपरीत परिणाम झाला आहे. हे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही. त्यामुळे इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी होत आहे.

यामुळे आहेत परभणीत सर्वाधिक दर -

परभणीजवळ इंधनाचा कुठलाही डेपो नाही. त्यामुळे जिह्यातील भारत पेट्रोलियम च्या पंपाना 330 किमी दूर असलेल्या मनमाड डेपोतून इंधन पुरवठा होतो. तर हिंदुस्थान पेट्रोलियम च्या पंपाना सोलापूर येथून पुरवठा केला जातो. या ठिकाणाहून इंधन येण्यासाठी वाहतूक खर्च मोठा लागतो. परिणामी पेट्रोल व डिझेल च्या किंमती वाढतात. त्यामुळे परभणी परिसरात किंवा जवळ असलेल्या एखाद्या मोठ्या शहरात इंधनाचा डेपो उभारावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत असते. मात्र, शासन याकडे कायम दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.

हेही वाचा - गैरमुस्लिम निर्वासितांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करावा, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अधिसूचना जारी

Last Updated : May 29, 2021, 5:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.