ETV Bharat / state

दिलासादायक! परभणी जिल्ह्यात आज केवळ 67 नवे कोरोनाबाधित, एकाचा मृत्यू - कोरोना रुग्णांच्या संख्येत घट परभणी

जिल्ह्यात मार्च आणि एप्रिल महिन्यात झपाट्याने वाढलेला कोरोनाचा संसर्ग आता कमी होताना दिसत आहे. आज शनिवारी 67 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 283 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे जिल्ह्यातील कोरोनाबधितांचा मृत्यूदर देखील कमी झाला असून, गेल्या 24 तासांत केवळ 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

परभणी जिल्हा कोरोना अपडेट
परभणी जिल्हा कोरोना अपडेट
author img

By

Published : May 29, 2021, 8:43 PM IST

परभणी - जिल्ह्यात मार्च आणि एप्रिल महिन्यात झपाट्याने वाढलेला कोरोनाचा संसर्ग आता कमी होताना दिसत आहे. आज शनिवारी 67 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 283 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे जिल्ह्यातील कोरोनाबधितांचा मृत्यूदर देखील कमी झाला असून, गेल्या 24 तासांत केवळ 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात 3 हजार 501 सक्रिय रुग्ण

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 49 हजार 781 वर पोहोचली असून, त्यातील 45 हजार 56 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 3 हजार 501 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मार्च आणि एप्रिल महिन्यात वाढलेला कोरोनाबधितांचा आकडा मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासून कमी होत गेला. दररोज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या 200 च्या आत आहे. आज तर हा आकडा 100 च्या देखील खाली आहे. शनिवारी नव्या 67 रुग्णांची भर पडली असून एकाचा मृत्यू झाला आहे, तर 283 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोनाच्या निदानासाठी जिल्ह्यात एकूण 3 लाख 40 हजार 148 चाचण्या

जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचे रुग्ण ज्या प्रमाणात वाढत होते, आता त्याला ब्रेक लागला असून, रुग्ण संख्येमध्ये घट होताना दिसत आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 49 हजार 781 वर पोहोचली असून, यातील 45 हजार 56 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1 हजार 224 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या 3 हजार 501 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान कोरोनाचे निदान करण्यासाठी आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 3 लाख 40 हजार 148 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - ''पतंजली''च्या खाद्यतेलात भेसळ, राजस्थानातील कारखाना केला सील

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.