ETV Bharat / state

परभणीत 4 नवे कोरोना रुग्ण...खबरदारी म्हणून तीन दिवसांचा लाॅकाडऊन

author img

By

Published : Jun 25, 2020, 4:11 PM IST

लॉकडाऊनच्या सुरुवातीचा दीड महिना ग्रीनझोनमध्ये असणाऱ्या परभणी जिल्ह्यात अचानक कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात उपाययोजनांची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे.

three-days-lock-down-after-4-new-corona-cases-in-parbhani
परभणीत 4 नवे कोरोना रुग्ण...

परभणी - शहरात बुधवारी 4 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी संपूर्ण शहर आणि परिसरातील पाच किलोमीटरच्या भागात संचारबंदी लागू केली आहे. त्यानुसार, शहरातील मेडिकल दुकाने वगळता एकही दुकान उघडलेली नाही. त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता.

परभणीत 4 नवे कोरोना रुग्ण.

लॉकडाऊनच्या सुरुवातीचा दीड महिना ग्रीनझोनमध्ये असणाऱ्या परभणी जिल्ह्यात अचानक कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात उपाययोजनांची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्यात सर्वप्रथम परभणी जिल्ह्याच्या 12 सीमा सील करण्यात आल्या होत्या. शिवाय सीमावर्ती भागातील 83 गावांमध्ये पथके तयार करुन रेड झोनमधून येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली.

जिल्ह्यात गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत शंभर रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 90 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, असे असले तरी बुधवारी एकाच दिवसात शहरातील विविध भागातील चार रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे शहरात संसर्ग पसरण्याची भीती निर्माण झाली. त्यामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बुधवारी रात्री आदेश जारी करुन गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस परभणी महानगरपालिका क्षेत्रासह परिसरातील पाच किलोमीटरमध्ये संचारबंदी लागू केली आहे.

एरवी प्रचंड गजबजा असलेला भाग गांधी पार्क, शिवाजी चौक, सुभाष रोड, स्टेशन रोड या मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट पसरला आहे. रेल्वे स्थानक, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परिसर, जिंतूर रोड, काळीकमान, वसमत रोड, गंगाखेड रोड व बस स्थानक आदी परिसरात देखील हीच परिस्थिती आहे. काल दिवसभरात आढळलेल्या 4 रुग्णांमुळे नागरिकांनी देखील खबरदारीच्या उपाययोजना म्हणून आज घरात राहणे पसंत केले.

सकाळी 6 ते 9 या वेळेत केवळ दूधवाल्यांनी व वृत्तपत्र विक्रेत्यांनी घरोघरी जाऊन वर्तमानपत्रे वाटायची आहेत. बँकांचा देखील नियमित व्यवहार बंद ठेवले आहेत. यामुळे शहरातील संसर्गावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.