ETV Bharat / state

परभणी जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला; ११ अंश सेल्सिअस तामनाची नोंद

काल जिल्ह्याचे तापमान केवळ ११ अंश सेल्सिअस एवढे निचांकी नोंदवण्यात आले आहे. तापमानात घसरण झाल्याने या वर्षीचा हिवाळा हुडहुडी भरवणारा ठरणार आहे.

tempreture change parbhani
परभणी जिल्ह्यात गुलाबी थंडीचा जोर वाढला
author img

By

Published : Nov 7, 2020, 5:18 PM IST

परभणी - जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून गुलाबी थंडीचा जोर वाढला आहे. काल जिल्ह्याचे तापमान केवळ ११ अंश सेल्सिअस एवढे निचांकी नोंदवण्यात आले आहे. जिल्ह्याच्या इतिहासात दोन वर्षांपूर्वी म्हणजेच, २०१८ साली डिसेंबर महिन्यात केवळ २ अंश सेल्सिअस एवढे निचांकी तापमान नोंदवण्यात आले होते. यंदा देखील तापमानाची घसरण महिनाभर आधीच झाली असून, परिणामी या वर्षीचा हिवाळा हुडहुडी भरवणारा ठरणार आहे.

माहिती देताना डॉ. कैलास डाखोरे

साधारणपणे नोव्हेंबर महिन्यानंतर थंडी पडू लागते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून परभणीत अचानक थंडीचा जोर वाढला आहे. साधारणपणे या दिवसांमध्ये १५ ते २० अंश या दरम्यान किमान तापमानाची नोंद होत असते. परंतु, यंदा हे तापमान ११ अंशापर्यंत खाली आले आहे, तर आज १२.६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. या पुढील काळात देखील तापमान घसरण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

वाढत्या थंडीवर ला-निनोचा प्रभाव

मागच्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कदाचित यावेळी थंडीचा जोर लवकर निर्माण झाल्याचा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र, प्रत्यक्षात अतिवृष्टीमुळे ही थंडी वाढली नसून, या थंडीवर 'ला-निनो' या नैसर्गिक प्रक्रियेचा प्रभाव असल्याचे परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाचे प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी सांगितले.

२०१८ मध्ये केवळ २ अंश सेल्सिअस एवढे तापमान त्या वेळेच्या हवामानाच्या परिस्थितीमुळे नोंदवण्यात आले होते. तर, आता देखील जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या ला-निनोच्या प्रभावामुळे तापमान ११ अंशावर आले आहे, असे देखील डॉ. डाखोरे यांनी सांगितले.

पिकांसाठी थंडी पोषक

सध्या बऱ्याच भागात खरिपात पेरलेली तूर आणि कपाशीची पिके उभी आहेत. या पिकांवर थंडीमुळे अळ्यांचा प्रादुर्भाव जाणवत आहे. हे प्रमाण कमी आहे. मात्र, रब्बी मधील पिकांसाठी ही थंडी मात्र पोषक असणार आहे. गव्हासाठी ही थंडी चांगली असून, येणाऱ्या काळात हरभऱ्याची देखील पेरणी होणार आहे. त्यासाठी देखील ही थंडी चांगलीच असेल, असे मत हवामान तज्ञ डॉ. डाखोरे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा- एकरकमी एफआरपी न दिल्यास कारखाने होतील जप्त; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.