परभणी - येथील जिंतूर तालुक्यातील अकोली येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून गजानन बबनराव रोकडे (वय 30) या तरुण शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.
कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; जिंतूर तालुक्यातील घटना
शेतात सतत नापिकीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गजानन रोकडे यांनी महिन्द्रा फायनन्सचे दीड लाख व मध्यवर्ती बँकेचे 50 हजार रुपयाचे कर्ज घेतले होते.
मृत गजानन बबनराव रोकडे
परभणी - येथील जिंतूर तालुक्यातील अकोली येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून गजानन बबनराव रोकडे (वय 30) या तरुण शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.
Intro:परभणी - जिंतूर तालुक्यातील अकोली येथे कर्जबारीपणाला कंटाळून गजानन बबनराव रोकडे (30) या तरुण शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.Body:गेल्या काही वर्षात परभणी जिल्ह्यात दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरी परेशान झाले आहेत. त्यातच जिंतूर तालुक्यातील परिस्थिती नाजूक आहे. तालुक्यातील अकोली परिसरात तर जनावरांच्या चाऱ्यासह पाण्याची परिस्थिती बिकट झाली आहे. शेतात सतत नापिकीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गजानन रोकडे यांनी महिन्द्रा फायनन्सचे दीड लाख व मध्यवर्ती बँकेचे 50 हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. मात्र हे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत ते नेहमी असायचे. ते परत करता येत नसल्यामुळे त्यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, असा परीवार आहे. त्यांच्या या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी जिंतूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत फोटो :- गजानन रोकडे.Conclusion:
- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत फोटो :- गजानन रोकडे.Conclusion: