ETV Bharat / state

परभणीच्या आमदारांनी घेतली शपथ; दोन आमदार सत्तेत, तर दोन विरोधी बाकावर

शपथविधी सोहळ्यादरम्यान जिंतूर येथील भाजप आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी शपथ पूर्ण केल्यानंतर 'जय श्रीराम'चा नारा दिला, तर गंगाखेडचे रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांनी 'जय भगवानबाबा' म्हणून आपली शपथ पूर्ण केली. याशिवाय, पाथरीचे काँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर आणि परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी आहे तोच मजकूर वाचून शपथ घेतली.

oath
परभणीच्या आमदारांनी घेतली शपथ
author img

By

Published : Nov 27, 2019, 4:53 PM IST

परभणी - नवनियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा आज विधानभवनात पार पडला. या सोहळ्यादरम्यान जिंतूर येथील भाजप आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी शपथ पूर्ण केल्यानंतर 'जय श्रीराम'चा नारा दिला, तर गंगाखेडचे रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांनी 'जय भगवानबाबा' म्हणून आपली शपथ पूर्ण केली. याशिवाय, पाथरीचे काँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर आणि परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी आहे तोच मजकूर वाचून शपथ घेतली.

परभणीच्या आमदारांनी घेतली शपथ

यावेळी, कारागृहातून निवडणूक लढवून विजयी होणारे रत्नाकर गुट्टे हेदखील शपथविधीसाठी पोहोचले होते. जिल्ह्यातील दोन आमदार सत्तेत सहभागी होणार असून, दोन विरोधी बाकावर बसणार आहेत. डॉ. राहुल पाटील आणि सुरेश वरपुडकर हे सत्तेत सहभागी होतील. तर, मेघना साकोरे-बोर्डीकर रत्नाकर गुट्टे दोघे मात्र विरोधी बाकावर बसतील.

हेही वाचा - आमदारकीची शपथ घेतल्यानंतर काय म्हणाले अजित पवार?

दरम्यान, आमदार रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड शुगर लिमिटेड या साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज उचलून त्याचा अपहार केल्याप्रकरणी कारागृहात आहेत. त्यांच्यावर इडीची चौकशी सुरू आहे. त्यांनी कारागृहातच ही निवडणूक लढवली आणि जिंकली होती.

Intro:परभणी - नवनियुक्त आमदार-खासदारांकडून विधिमंडळातील शपथ सोहळ्यादरम्यान अनेक प्रकारच्या घोषणा ऐकावयास मिळतात. अनेकजण वेगळ्या पद्धतीने शपथ घेऊन लक्ष वेधतात. त्यानुसार परभणीच्या जिंतूर येथील भाजपच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी शपथ पूर्ण झाल्यानंतर शेवटी 'जय श्रीराम' चा नारा दिला, तर गंगाखेडचे रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांनी 'जय भगवानबाबा' म्हणून आपली शपथपूर्ण केली. विशेष म्हणजे कारागृहातुन निवडणूक लढवून ती जिंकणारे गुट्टे हे परभणीच्या कारागृहातून बाहेर निघून थेट शपथविधीच्या सोहळ्यात पोहचले होते.Body:

दरम्यान, पाथरीचे काँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर यांनी मात्र साध्या पद्धतीने शपथग्रहण केली. तर परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी सुद्धा अगदी आहे, तोच मचकूर वाचून आपली शपथ पूर्ण केली.
परभणी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये चार पक्षांचे आमदार निवडून आले आहेत. परभणीत शिवसेना, जिंतूरात भाजप तर गंगाखेडमध्ये रासप आणि पाथरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार विजय झालेला आहे. या चारही उमेदवारांनी आज विधिमंडळात आमदारकीची शपथ घेतली. विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यातील दोन आमदार सत्तेत सहभागी होणार असून, दोन विरोधी बाकावर बसणार आहेत. शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील यांना तर थेट मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. ते शिवसेनेच्या तिकिटावर दुसऱ्यांदा निवडून आले असून शिवसेनेतील सर्वाधिक (81 हजारांच्या) मताधिक्याने निवडून आलेले आहेत. शिवाय युवा सेनेचे ते पहिले आमदार आहेत आणि आदित्य ठाकरे यांच्या नजीकचे म्हणून ओळखल्या जातात. तसेच पाथरीचे काँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर हे देखील अनुभवी आमदार असून यापूर्वी आघाडी सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते. याशिवाय जिंतूरातील भाजपच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर आणि गंगाखेडचे रासप आमदार रत्नाकर गुट्टे हे दोघे मात्र विरोधी बाकावर बसतील. आमदार रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड शुगर लिमिटेड या साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकर्यांच्या परस्पर हजारो कोटी रुपयांचे कर्ज उचलून त्याचा अपहार केल्याप्रकरणी परभणीच्या कारागृहात आहेत. त्यांच्यावर इडीची चौकशी सुरू असून न्यायालयाच्या आदेशाने ते कारागृहात आहेत. विशेष म्हणजे त्यांनी कारागृहातच ही निवडणूक लढविली आणि ती जिंकली सुद्धा. त्यांच्यासाठी रासपचे प्रमुख महादेव जानकर गंगाखेडमध्ये ठाण मांडून होते.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- फोटो:- राहुल पाटील, मेघना बोर्डीकर, सुरेश वरपूडकर, रत्नाकर गुट्टे.
- Vis :- pbn_new_mla_assembly_visConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.