परभणी - पंढरपूर येथे १२ जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने नांदेड, नगरसोल आणि अकोला येथून प्रत्येकी दोन अशा एकूण 6 विशेष गाड्या परभणीमार्गे चालवण्यात येणार आहेत. या गाड्या ११ जुलै रोजी पंढरपूरकडे धावणार असून १३ जुलै रोजी परतीचा प्रवास करणार आहेत. यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील वारकऱ्यांची मोठी सोय होणार आहे.
आदिलाबाद-पंढरपूर-आदिलाबाद (गाडी क्र. ०७५०१ व ०७५०२) या गाडीच्या २ फेऱ्या होणार आहेत. आदिलाबाद-पंढरपूर विशेष गाडी आदिलाबाद येथून ११ जुलैला सकाळी ९ वाजता सुटेल. किनवटला १०.१४ वाजता तर नांदेड दुपारी १३.०५, परभणी १४.२७, परळी १६.१०, लातूर १९.१० आणि पंढरपूर येथे रात्री २३.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात पंढरपूर-आदिलाबाद ही विशेष गाडी १३ जुलै रोजी पंढरपूर येथून सकाळी ५.३० वाजता सुटेल. लातूरमार्गे परळीला १३.३० वाजता तर परभणीला १५.०५ वाजता, नांदेडला १६.१० वाजता, भोकर येथे १७.२२ वाजता, किनवट १९.२२ येथे वाजता आणि आदिलाबाद येथे रात्री २०.४० वाजता पोहोचेल. या गाडीला १० डब्बे असतील.
दुसरी नगरसोल-पंढरपूर ही विशेष गाडी नगरसोल येथून ११ जुलै रोजी सकाळी ५ वाजता सुटेल. रोटेगाव, परसोडा, लासूर मार्गे औरंगाबाद येथे ६.१५ वाजता पोहोचून ६.३० वाजता सुटेल. जालना येथे सकाळी ८ वाजता, परतूर, सेलू, मानवत रोड मार्गे परभणी येथून सकाळी ११.३० वाजता सुटेल, पुढे गंगाखेड ११.५२, परळी- १३.२० वाजता सुटून लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी टाऊन, कुर्डूवाडी मार्गे ही गाडी पंढरपूर येथे त्याच दिवशी रात्री २०.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात पंढरपूर-नगरसोल ही विशेष गाडी पंढरपूर तेथून १३ जुलै रोजी सकाळी ८ वाजता सुटेल. परळीला १७.१५ वाजता, परभणी १९.१७ वाजता, जालना २१.५५ वाजता, औरंगाबाद येथे रात्री २३ वाजता पोहोचेल आणि १४ जुलैला पहाटे १.३५ वाजता नगरसोल येथ पोहोचेल. या गाडीला ११ डबे असतील.
तिसरी अकोला-पंढरपूर-अकोला (०७५२३ / ०७५२४) ही विशेष गाडी अकोला येथून ११ जुलै रोजी सकाळी ५.५० वाजता सुटेल. वाशीमला ६.३५ वाजता, हिंगोली ७.४५ वाजता, पूर्णा ९.३५ वाजता तर परभणी येथे ११.३० वाजता पोहोचेल. ही गाडी परभणी येथे नगरसोल-औरंगाबाद येथून येणाऱ्या गाडीला (संख्या ०७५१५) जोडण्यात येईल. पुढे ही गाडी पंढरपूर येथे रात्री २०.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी परभणीपर्यंत येईल आणि परभणी येथून अकोलाकडे जाणारे डब्बे वेगळे करून १९.१० वाजता सुटून अकोला येथे रात्री २३.४५ वाजता पोहोचेल. या गाडीला ११ डबे असतील. या गाड्यांचा भाविकांनी फायदा घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.