ETV Bharat / state

'ना खाऊंगा, ना खाने दुंगा' म्हणणाऱ्यांचा 'राफेल' घोटाळा - शरद पवार - Light

'ना खाऊंगा, ना खाने दुंगा' म्हणणाऱ्यांनी साडेतीनशे कोटींचे राफेल सोळाशे कोटींना खरेदी केले, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

परभणी सभेत शरद पवारांचा मोदींंवर आरोप
author img

By

Published : Mar 26, 2019, 8:11 PM IST

Updated : Mar 26, 2019, 8:40 PM IST

परभणी - 'खाऊंगा ना खाने दुंगा' असे म्हणत सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ३५० कोटी रुपयांचे राफेल विमान १ हजार ६७० कोटी रुपयांना खरेदी केले, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज परभणीत केला. शिवाय पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई करणारे अभिनंदन यांना जागतिक दबावापोटी सोडण्यात आले. मात्र, त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न ५६ इंच छातीवाले मोदी करत असल्याचेही पवार म्हणाले.

परभणी सभेत शरद पवारांचा मोदींंवर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ स्टेडियम मैदानात आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, ५ वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींनी देशभरात 'ना खाऊंगा, ना खाने दुंगा' म्हणत जनतेला खोटी आश्वासने दिली. आजच्या परिस्थितीत पाणी नाही, वीज नाही, शेतकरी त्रस्त आहे. शेतकऱ्यांना केवळ आश्वासने दिले जातात. यूपीए सरकारच्या काळात आम्ही शेतकऱ्यांची परिस्थिती बघून तत्काळ कर्जमाफीचा निर्णय घेतला. कर्जमाफी देऊन थांबलो नाही तर पुन्हा नवीन कर्ज दिले. मात्र, या भाजप सरकारचे काय चालले समजत नाही ? केवळ कर्जमाफी जाहीर होते. मात्र, शेतकऱ्यांच्या पदरी काही पडत नाही. अशा शेतकरीद्वेशी सरकारला हाकलून लावायला पाहिजे. यासाठी मी तुमच्यापुढे आलो आहे. तुम्हाला राजेश विटेकर यांच्या रूपाने दमदार आणि तरुण चेहरा दिला आहे. त्याला निवडून आणा, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

सर्जिकल स्ट्राईकनंतर वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून त्यांचा हल्ला परतवून लावला. त्यावेळी वायुदलाचा अधिकारी अभिनंदन हा पाकिस्तानच्या ताब्यात गेला. त्याची सुटका केवळ जागतिक दबावामुळे झाली आहे. असे असताना हे ५६ इंच छातीवाले सांगतात, की आम्ही त्यांची सुटका केली. सर्वपक्षीय बैठकीत याबाबत राजकारण करू नये, असे ठरलेले असताना भाजप मात्र, याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे. ही सुटका केवळ जागतिक दबावामुळे झाली आहे. याचे श्रेय भाजपला नाही, असेही शरद पवार म्हणाले.

या सभेच्या मंचकावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उमेदवार राजेश विटेकर, महिला राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार बाबाजानी दुर्रानी, मधुसूदन केंद्रे, विजय भांबळे, रामराव वडकुते, माजी आमदार सुरेश देशमुख, सुरेश जेथलिया, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर, सोनाली देशमुख, सभागृहनेते भगवान वाघमारे, बाळासाहेब जामकर, किरण सोनटक्के व काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

उदयनराजे भोसले आलेच नाहीत -

परभणीतील उमेदवार राजेश विटेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी व सभेत मार्गदर्शन करण्यास छत्रपती उदयनराजे भोसले येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीने दिली होती. परंतू, प्रत्यक्षात मात्र उदयनराजे परभणीत आलेच नाहीत. परभणीतील तरुण उदयनराजे यांची स्टाईल पाहण्यासाठी व भाषण ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते. मात्र, त्यांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले.

Intro:परभणी - खाऊंगा ना खाने दुंगा असे म्हणत सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या यांच्या सरकारने 350 कोटी रुपयांचे राफेल विमान सोळाशे 70 कोटी रुपयांना खरेदी केले, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज (मंगळवारी) परभणीत केला. शिवाय पाकिस्तान मध्ये घुसून कारवाई करणारे अभिनंदन यांना जागतिक दबावापोटी सोडण्यात आले. मात्र त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न 56 इंच छाती वाले मोदी करत असल्याचेही पवार म्हणाले.
Body:राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ स्टेडियम मैदानात आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले पाच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींनी देशभरात 'ना खाऊंगा ना खाने दुंगा' म्हणत जनतेला खोटी आश्वासने दिली. आजच्या परिस्थितीत पाणी नाही, वीज नाही, शेतकरी परेशान आहे. शेतकऱ्यांना केवळ आश्वासने दिल्या जातात. यूपीए सरकारच्या काळात आम्ही शेतकऱ्यांची परिस्थिती बघून तात्काळ कर्जमाफीचा निर्णय घेतला कर्जमाफी देऊन थांबलो नाही तर पुन्हा नवीन कर्ज दिले. मात्र या भाजप सरकारचे काय चालले समजत नाही ? केवळ कर्जमाफी जाहीर होते मात्र शेतकऱ्यांच्या पदरी काही पडत नाही, अशा शेतकरी द्वेशी सरकारला हाकलून लावायला पाहिजे. यासाठी मी तुमच्यापुढे आलो आहे, तुम्हाला राजेश विटेकर यांच्या रूपाने दमदार आणि तरुण चेहरा दिला आहे. त्याला निवडून आणा, असे आवाहन शरद पवार यांनी केले.
दरम्यान सर्जिकल स्ट्राइकनंतर वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून त्यांचा हल्ला परतवून लावला. त्यावेळी वायुदलाचा अधिकारी अभिनंदन हा पाकिस्तानच्या ताब्यात गेला होता, त्याची सुटका केवळ जागतिक दबावामुळे झाली आहे. असे असताना हे 56 इंच छाती वाले सांगतात की आम्ही त्यांची त्यांची सुटका केली. सर्वपक्षीय बैठकीत याबाबत राजकारण करू नये, असे ठरलेले असताना भाजप मात्र याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे. ही सुटका केवळ जागतिक दबावामुळे झाली आहे याचे श्रेय भाजपला नाही, असेही शरद पवार म्हणाले.
या सभेच्या व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उमेदवार राजेश विटेकर, महिला राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार बाबाजानी दुर्रानी, मधुसूदन केंद्रे, विजय भांबळे, रामराव वडकुते, माजी आमदार सुरेश देशमुख, सुरेश जेथलिया, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर, सोनाली देशमुख, सभागृहनेते भगवान वाघमारे, बाळासाहेब जामकर, किरण सोनटक्के व काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

"उदयनराजे भोसले आलेच नाहीत"
दरम्यान परभणीतील उमेदवार राजेश विटेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी व सभेत मार्गदर्शन करण्यास छत्रपती उदयनराजे भोसले येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीने दिली होती. परंतु प्रत्यक्षात मात्र उदयनराजे परभणीत आलेच नाहीत. परभणीतील तरुण उदयनराजे यांची स्टाईल पाहण्यासाठी व भाषण ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते मात्र त्यांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत शरद पवार भाषण, सभा visualsConclusion:
Last Updated : Mar 26, 2019, 8:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.