ETV Bharat / state

रत्नाकर गुट्टे यांनी कारागृहातून गंगाखेडची निवडणूक जिंकली; परभणीत नवा इतिहास - maharashtra election results live update

गंगाखेड विधानसभा मतदार संघातील रासपचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांनी कारागृहातून निवडणूक लढवत विजय मिळवला आहे.

विजयी उमेदवार रत्नाकर गुट्टे
author img

By

Published : Oct 24, 2019, 5:28 PM IST

Updated : Oct 24, 2019, 6:20 PM IST

परभणी - जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एखाद्या उमेदवाराने कारागृहात राहून विधानसभेची निवडणूक लढविली आणि ती जिंकली देखील. हे घडले आहे, गंगाखेड विधानसभा मतदार संघातील रासपचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांच्या बाबतीत. त्यांनी महायुतीचा निर्णय झुगारून शिवसेनेचे उमेदवार विशाल कदम यांच्या विरोधात निवडणूक लढवली. कदम यांच्यावर 18 हजार मतांची आघाडी घेवून विजय संपादन केला. हा एक प्रकारे केवळ परभणी जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात इतिहास घडला आहे.

माहिती सांगताना प्रतिनिधी

मतदारसंघ महायुतीच्या वाटाघाटीत शिवसेनेच्या वाट्याला गेला होता; परंतु 2014 च्या निवडणुकीत भाजपने हा मतदार संघ रासपला देऊ केला होता. त्यानुसार रासपचे नेते तथा उद्योजक रत्नाकर गुट्टे यांनी ही निवडणूक लढवली. त्यांना अगदी थोड्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, त्यानंतर उमेद न हरता रत्नाकर गुट्टे यांनी पाच वर्ष जोरदार तयारी सुरू ठेवली. परंतु मध्यंतरीच्या काळात विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि गंगाखेडचे आमदार मधुसूदन केंद्रे यांच्या तक्रारीवरून त्यांच्यावर शेतकऱ्यांचे परस्पर साडेपाच हजार कोटी रुपयांचे कर्ज उचलून त्याचा अपहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला. ईडीने त्यांची चौकशी लावली. त्यामुळे ते सध्या परभणीच्या कारागृहात आहेत.

दरम्यान, गुट्टे कारागृहात असल्याने भाजपने गंगाखेड विधानसभेची जागा शिवसेनेला दिली. त्यानुसार शिवसेनेने या ठिकाणी जिल्हाप्रमुख विशाल कदम यांना उमेदवारी देऊन रिंगणात उतरवले होते. असे असतानाही महादेव जानकर यांनी रत्नाकर गुट्टे यांना रासपचे उमेदवारी दिली. 'मी महायुती सोबतच आहे. मात्र, गंगाखेडमध्ये आमचा अधिकारी असून रत्नाकर गुट्टे निवडणूक लढवतील', असा ठाम निर्णय महादेव जानकर यांनी व्यक्त केला. त्यानुसार महादेव जानकर यांनी स्वतः गंगाखेड मध्ये ठाण मांडून गुट्टे यांच्या विजयासाठी जिकिरीचे प्रयत्न केले. तसेच रत्नाकर गुट्टे यांच्या मागे त्यांचे जावई राजेभाऊ फड यांनी सर्व कमान सांभाळून हा विजय खेचून आणला, असेच म्हणावे लागेल.

विशेष म्हणजे गंगाखेड शुगरचे चेअरमन असलेल्या रत्नाकर गुट्टे यांच्या साखर कारखान्यावर गंगाखेड विधानसभेतील शेतकऱ्यांचे मोठे अर्थकारण अवलंबून आहे. हजारो शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला जात असल्याने शेतकऱ्यांची त्यांच्या बाजूने सहानुभूती होती. हीच सहानुभूती त्यांना कारागृहात असतांना देखील विजयापर्यंत पोहोचू शकली.

एकूणच परभणीच्या नव्हे तर मराठवाड्याच्या इतिहासात प्रथमत एखाद्या उमेदवाराने कारागृहात राहून विधानसभेचे युद्ध जिंकले. महाराष्ट्रातल्या सध्याच्या विधानसभा निवडणुकीत देखील रत्नाकर गुट्टे हे एकमेव उमेदवार आहेत, जे कारागृहातून निवडणूक लढले.

दरम्यान, रत्नाकर गुट्टे यांना 80 हजार 605 मते मिळाली असून, त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे विशाल कदम यांना 61 हजार 709 मते मिळाली आहेत. गुट्टे यांचा 18496 मतांनी विजय झाला.

Intro:परभणी - जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एखाद्या उमेदवाराने कारागृहात राहून विधानसभेची निवडणूक लढविली आणि ती जिंकली देखील. हे घडले आहे, गंगाखेड विधानसभा मतदार संघातील रासपचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांच्या बाबतीत. त्यांनी महायुतीचा निर्णय झुगारून शिवसेनेचे उमेदवार विशाल कदम यांच्या विरोधात निवडणूक लढवली. कदम यांच्यावर 18 हजार मतांची आघाडी घेवून विजय संपादन केला. हा एक प्रकारे केवळ परभणी जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात इतिहास घडला आहे.Body:परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा
मतदारसंघ महायुतीच्या वाटाघाटीत शिवसेनेच्या वाट्याला गेला होता; परंतु 2014 च्या निवडणुकीत भाजपने हा मतदार संघ रासपला देऊ केला होता. त्यानुसार रासपचे नेते तथा उद्योजक रत्नाकर गुट्टे यांनी ही निवडणूक लढवली. त्यांना अगदी थोड्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. मात्र त्यानंतर उमेद न हरता रत्नाकर गुट्टे यांनी पाच वर्ष जोरदार तयारी सुरू ठेवली. परंतु मध्यंतरीच्या काळात विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि गंगाखेडचे आमदार मधुसूदन केंद्रे यांच्या तक्रारीवरून त्यांच्यावर शेतकऱ्यांचे परस्पर साडेपाच हजार कोटी रुपयांचे कर्ज उचलून त्याचा अपहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला. ईडीने त्यांची चौकशी लावली. त्यानुसार ते सध्या परभणीच्या कारागृहात आहेत.
दरम्यान, गुट्टे कारागृहात असल्याने भाजपने गंगाखेड विधानसभेची जागा शिवसेनेला दिली. त्यानुसार शिवसेनेने या ठिकाणी जिल्हाप्रमुख विशाल कदम यांना उमेदवारी देऊन रिंगणात उतरवले होते. असे असतानाही महादेव जानकर यांनी रत्नाकर गुट्टे यांना रासपचे उमेदवारी दिली. 'मी महायुती सोबतच आहे, मात्र गंगाखेडमध्ये आमचा अधिकारी असून रत्नाकर गुट्टे निवडणूक लढवतील', असा ठाम निर्णय महादेव जानकर यांनी व्यक्त केला. त्यानुसार महादेव जानकर यांनी स्वतः गंगाखेड मध्ये ठाण मांडून गुट्टे यांच्या विजयासाठी जिकिरीचे प्रयत्न केले. तसेच रत्नाकर गुट्टे यांच्या माघारी त्यांचे जावई राजेभाऊ फड यांनी सर्व कमान सांभाळून हा विजय खेचून आणला, असेच म्हणावे लागेल. विशेष म्हणजे गंगाखेड शुगरचे चेअरमन असलेल्या रत्नाकर गुट्टे यांच्या साखर कारखान्यावर गंगाखेड विधानसभेतील शेतकऱ्यांचे मोठे अर्थकारण अवलंबून आहे. हजारो शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला जात असल्याने शेतकऱ्यांची त्यांच्या बाजूने सहानुभूती होती. हीच सहानुभूती त्यांना कारागृहात असतांना देखील विजयापर्यंत पोहोचू शकली.
एकूणच परभणीच्या नव्हे तर मराठवाड्याच्या इतिहासात प्रथमत एखाद्या उमेदवाराने कारागृहात राहून विधानसभेचे युद्ध जिंकले. महाराष्ट्रातल्या सध्याच्या विधानसभा निवडणुकीत देखील रत्नाकर गुट्टे हे एकमेव उमेदवार आहेत, जे कारागृहातून निवडणूक लढले.
दरम्यान रत्नाकर गुट्टे यांना 80 हजार 605 मते मिळाली असून, त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे विशाल कदम यांना 61 हजार 709 मते मिळाली आहेत. गुट्टे यांचा 18496 मतांनी विजय झाला.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- photo :- ratnakar gutte
pbn_gangakhed_gutte_vis & wkt Conclusion:
Last Updated : Oct 24, 2019, 6:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.