ETV Bharat / state

परभणीत 'महाविकासआघाडी'च्या विरोधात भाजपाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

author img

By

Published : Oct 12, 2020, 7:32 PM IST

महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा आरोप करत भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

protests-by-bjp-against-mahavikasghadi-government-in-front-of-collector-office-in-parbhani
परभणीत 'महाविकासघाडी'च्या विरोधात भाजपाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

परभणी - राज्यातील महाविकासआघाडी सरकार हे महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप करत आज परभणीत भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यासोबतच वसमत रोडवर रस्तारोको आंदोलनही केले त्यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून महिलांवरील अत्याचाराच्या घटनाची मालिका सुरु झाली असल्याचा आरोप यावेळी आमदार मेघना बोर्डीकर यांनी केला. तसेच या सरकारकडून बलात्कारांच्या घटनाचाही राजकारणासाठी वापर करण्यात येत आहे. हाथरस येथील घटना घडल्यानंतर राज्यभरात रस्त्यावर उतरून आंदोलने करण्यात आली; परंतु गेल्या सहा महिन्यात महाराष्ट्रात कितीतरी महिलावर अन्याय झाले. त्याचे कुठलेही सोयरसुतक या सरकारला नाही. त्यामुळे मी या सरकारच्या कार्यपध्दतीचा निषेध करते, असेही मेघना बोर्डीकर म्हणाल्या. तसेच या दुदैवी घटनांच्या विरोधात राज्य सरकार आवाज उठविताना दिसत नाही, असा आरोप भाजपचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांनी केला. राज्यातील अत्याचाराच्या घटना कमी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने महिलांच्या संरक्षणाची जबबादारी गांभीर्याने पार पाडली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी निदर्शने करताना पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात येत होते. त्यामुळे भाजप ग्रामीण शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार मेघना बोर्डीकर व जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम यांच्या नेतृत्वाखाली वसमत रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.