ETV Bharat / state

परभणीत तलाठ्याच्या खासगी सहाय्यकाला लाच घेताना अटक - 7000 rs bribe demanding assistant parbhani news

कारेगाव सज्जाच्या तलाठ्याच्या खासगी सहाय्यकाला लाच घेताना अटक करण्यात आली आहे. मदन चोपडे असे या खासगी सहायकाचे आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून सहाय्यकाला 7 हजार रुपयांची लाच स्वीकारताना शुक्रवारी रंगेहात अटक केली.

author img

By

Published : Nov 6, 2020, 6:36 PM IST

परभणी - कारेगाव हद्दीतील प्लॉटचा फेरफार करण्यासाठी कारेगाव सज्जाच्या तलाठ्याच्या खासगी सहाय्यकाला लाच घेताना अटक करण्यात आली आहे. घटनेतील लाच घेणाऱ्या या खाजगी सहायकाचे नाव मदन चोपडे असे आहे. त्याने तक्रारदाराकडे प्लॉटचा फेरफार करण्यासाठी 7 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून सहाय्यकाला 7 हजार रुपयांची लाच स्वीकारताना शुक्रवारी रंगेहात पकडून अटक केली आहे.

हेही वाचा - इन्शुरन्स रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवून 3 कोटींची फसवणूक; चौघांना अटक
अशी झाली कारवाई
कारेगाव हद्दीत असलेल्या प्लॉटचा फेरफार करण्यासाठी तलाठ्याचा खासगी सहाय्यक मदन चोपडे याने सात हजार रुपयांची मागणी केल्याचे तक्रारदारांनी सांगितले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक भरत हुंबे यांनी त्यांच्या टीमसह सापळा रचून आरोपीला रंगेहाथ पकडले. चोपडे याच्याविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उपअधीक्षक भरत हुंबे यांनी दिली.

हेही वाचा - कमल हासन लढवणार तामिळनाडू विधानसभा निवडणूक!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.