ETV Bharat / state

परभणीत हायप्रोफाईल जुगार अड्यावर छापा; साडेआठ लाख रुपयांच्या मुद्देमालासह 20 जुगारी अटकेत - हायप्रोफाईल जुगार अड्डा

शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चालणाऱ्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर मध्यरात्री पोलिसांनी अचानक धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत सुमारे लाख रुपयांच्या रोकडसह तब्बल साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून २० जुगाऱ्यांना अटक करण्यात आली आहे

परभणीत हायप्रोफाईल जुगार अड्यावर धाड
author img

By

Published : Sep 4, 2019, 6:31 PM IST

परभणी - शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चालणाऱ्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अचानक धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत सुमारे लाख रुपयांच्या रोकडसह तब्बल साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच 20 जुगारींना अटक करण्यात आले असून 7 जण मात्र फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.

परभणीत हायप्रोफाईल जुगार अड्यावर धाड

शहराच्या उत्तरे दिशेला बेलेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिराच्या मागील बाजूने जाणाऱ्या कॅनलच्या रस्त्यावर साधारणपणे 1 किमी दूर एक हाय प्रोफाईल जुगार अड्डा चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मध्यरात्री पोलिसांनी नितेश (भैय्या) प्रकाश देशमुख याच्या आखाड्यावर चालणाऱ्या या जुगार अड्यावर धाड टाकली. या ठिकाणी पोलिसांनी रोख 93 हजार 240 रुपये, 9 मोबाईल हँन्डसेट, 12 मोटारसायकल असा 8 लाख 44 हजार 240 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

तसेच जुगारी नितेश प्रकाश देशमुख, देवा चव्हाण, राजु उर्फ कन्हैया पवार, महेश संभाजीराव साखरे, विजय गंगाराम खुने, संतोष भरतराव झाडे, सचिन पवार, मंगेश दिपके, गौतम उर्फ बाबा वायतळ, अनिल नागोराव झाटे, राहुल पंढरीनाथ घोडके, शैलेश रमेश चव्हाण, नारायण खाडे, सुरेश शेळके, महेश रुस्तुमराव खलाळ, वैभव विश्वनाथ झोडपे, मो. अक्रमोद्दीन मो. असेफोद्दीन, गजानन बाळासाहेब चव्हाण, गौरव देशमुख, हनुमान रायमले आदींना पकडले आहे. तसेच पोलिसांना चुकांडा देऊन 7 मोटारसायकलवाले फरार झाले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक रागसुधा आर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि एच.जी पांचाळ, पोहेकॉ. हनुमंत कच्छवे, सखाराम टेकुळे, जगदिश रेड्डी, श्रीकांत घनसावंत, अतुल कांदे, पुजा भोरगे, गजेंद्र चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.

दरम्यान, या जुगार अड्ड्यावर तीन टेबलांवर जुगाराचा फड रंगला होता. या तीनही टेबलवरील जुगारी आणि त्यांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. शहरात चालणाऱ्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर ही मोठी कारवाई झाल्याने इतर अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

Intro:परभणी - शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चालणाऱ्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अचानक धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत सुमारे लाख रुपयांच्या रोकडसह तब्बल साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच 20 जुगारी अटक करण्यात आले असून 7 जण मात्र फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.Body:शहराच्या उत्तरे दिशेला बेलेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिराच्या मागील बाजूने जाणाऱ्या कॅनलच्या रस्त्यावर साधारणपणे एक किलोमीटर दूर एक हाय प्रोफाईल जुगार अड्डा चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मध्यरात्री पोलिसांनी नितेश (भैय्या) प्रकाश देशमुख याच्या आखाड्यावर चालणाऱ्या या जुगार अड्यावर धाड टाकली. या ठिकाणी पोलिसांनी रोख 93 हजार 240 रुपये, नऊ मोबाईल हँन्डसेट, बारा मोटारसायकल असा 8 लाख 44 हजार 240 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच जुगारी नितेश प्रकाश देशमुख, देवा चव्हाण, राजु उर्फ कन्हैया पवार, महेश संभाजीराव साखरे, विजय गंगाराम खुने, संतोष भरतराव झाडे, सचिन पवार, मंगेश दिपके, गौतम उर्फ बाबा वायतळ, अनिल नागोराव झाटे, राहुल पंढरीनाथ घोडके, शैलेश रमेश चव्हाण, नारायण खाडे, सुरेश शेळके, महेश रुस्तुमराव खलाळ, वैभव विश्वनाथ झोडपे, मो.अक्रमोददीन मो. असेफोददीन, गजानन बाळासाहेब चव्हाण, गौरव देशमुख, हनुमान रायमले आदींना पकडले आहे. तसेच पोलिसांना चुकांडा देऊन 7 मोटारसायकलवाले फरार झाले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक रागसुधा आर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि एच.जी पांचाळ, पोहेकॉ. हनुमंत कच्छवे, सखाराम टेकुळे, जगदिश रेड्डी, श्रीकांत घनसावंत, अतुल कांदे, पुजा भोरगे, गजेंद्र चव्हाण यांच्या पथकाने केली आहे. दरम्यान, या जुगार अड्ड्यावर तीन टेबलांंवर जुगाराचा फड रंगला होता. या तीनही टेबलवरील जुगारी आणि त्यांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. शहरात चालणाऱ्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर ही मोठी कारवाई झाल्याने इतर अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- sp office visConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.