ETV Bharat / state

कोरोना नियमांचे उल्लंघन : ‘एसटी’ला 1 लाखाचा दंड; शासकीय यंत्रणेवर कारवाईची पहिलीच घटना - State transport bus service fined for 1 lakh

जिंतूर डेपोचीच बस (एम.एच. 20 1922) जिंतूरवरून लातूरकडे निघाली होती. ही बस प्रवाशांनी गच्च भरलेली दिसून आली. या बसमध्ये जवळपास 82 प्रवाशी प्रवास करत होते. त्यामुळे उपविभागीय अधिकार्‍यांनी शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात ही बस थांबवत, कोरोना नियमांचा भंग झाला म्हणून 1 लाख रुपयांचा दंड लावण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, कोरोना काळात एसटी महामंडळाच्या बसवर कारवाई करण्याची ही परभणी जिल्ह्यासह राज्यातील पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे...

Parbhani State transport bus service fined for 1 lakh due to not following corona rules
कोरोना नियमांचे उल्लंघन : ‘एसटी’ला 1 लाखाचा दंड; शासकीय यंत्रणेवर कारवाईची पहिलीच घटना
author img

By

Published : Mar 19, 2021, 2:11 AM IST

परभणी - जिल्ह्यातील जिंतूर आगाराच्या एसटी बसमधून जिल्हाधिकार्‍यांनी घालून दिलेल्या कोरोना संसर्गाच्या बाबतीतील नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी आज (गुरुवारी) महामंडळाच्या बसवर कारवाई करून 1 लाख रुपयांचा दंड लावला आहे. विशेष म्हणजे, शासकीय यंत्रणांमध्ये नियमांचे पालन होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर लावण्यात करण्यात आलेली महाराष्ट्रातील ही पहिलीच कारवाई असल्याचे म्हटले जात आहे.

जिंतुरात कोरोनाचे वाढते रुग्ण..

सध्या जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून, मागील आठवड्यापासून जवळपास 100 ते 150 रुग्ण एकट्या जिंतूर शहरात आढळून आले आहेत. परंतु शहरातील व्यापारी व नागरिक नियमांचे पालन करत नाहीत. त्यात जिल्हाधिकार्‍यांनी परजिल्ह्यात जाणारी व येणार्‍या खाजगी वाहन व जिल्ह्यांतून इतर जिल्ह्यात जाणार्‍या महामंडळाच्या बसवर बंदी घातलेली आहे. असे असले तरी खाजगी तसेच एसटी महामंडळाच्या बसेस सर्रासपणे प्रतिबंध लावण्यात आलेल्या जिल्ह्यात जात-येत आहेत. अनेक बसमधून खचाखच प्रवासी भरून जात आहेत. बस स्थानकावर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. शिवाय बस स्थानकांमध्ये कोरोना पासून बचाव करण्यासाठीच्या कुठल्याही उपाययोजना दिसून येत नाहीत.

तब्बल 82 प्रवासी घेऊन जात होती बस..

दरम्यान, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी कार्यालयीन कामासाठी आज दुपारी जिंतूर शहरात आले असता, या ठिकाणच्या बसस्थानकातून जिंतूर डेपोच्या बस इतर जिल्ह्यात वाहतुकीस जात असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये जिंतूर डेपोचीच बस (एम.एच. 20 1922) जिंतूरवरून लातूरकडे निघाली होती. ही बस प्रवाशांनी गच्च भरलेली दिसून आली. या बसमध्ये जवळपास 82 प्रवाशी प्रवास करत होते. त्यामुळे उपविभागीय अधिकार्‍यांनी शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात ही बस थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरून दिले. त्यानंतर ही बस तहसील कार्यालयात लावण्यात आली. या प्रकरणात कोरोना नियमांचा भंग झाला म्हणून 1 लाख रुपयांचा दंड लावण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, कोरोना काळात एसटी महामंडळाच्या बसवर कारवाई करण्याची ही परभणी जिल्ह्यासह राज्यातील पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.