ETV Bharat / state

परभणीच्या शिवसेना खासदाराचा दिल्लीत जल्लोष

तब्बल महिनाभराच्या राजकीय नाट्यानंतर महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. या पार्श्वभूमीवर परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यासह इतर खासदारांनी दिल्लीत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी सेनेच्या खासदारांनी फटाक्यांची आतषबाजी करत घोषणाबाजी  केली.

parbhani shivsena MP Sanjay Jadhav celebration in delhi
परभणीच्या शिवसेना खासदाराचा दिल्लीत जल्लोष
author img

By

Published : Nov 27, 2019, 9:58 PM IST

परभणी - तब्बल महिनाभराच्या राजकीय नाट्यानंतर महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. या पार्श्वभूमीवर परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यासह इतर खासदारांनी दिल्लीत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी सेनेच्या खासदारांनी फटाक्यांची आतषबाजी करत घोषणाबाजी केली.

परभणीच्या शिवसेना खासदाराचा दिल्लीत जल्लोष

मागच्या ५ वर्षाच्या सत्ताकाळात राज्य सरकारमध्ये शिवसेनेची एक प्रकारे कुचंबना झाल्याची भावना शिवसैनिकांमधून व्यक्त होत आहे. त्यानंतर आता शिवसेनेला आपल्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करता येणार असल्याने शिवसेना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. यावेळी खासदार हेमंत गोडसेही उपस्थित होते.

Intro:
परभणी :- तब्बल महिनाभराच्या राजकीय नाट्यानंतर महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. या पार्श्वभूमीवर परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यासह इतर खासदारांनी दिल्लीत याचा आनंदोत्सव साजरा केला. जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी केली.Body:

मागच्या पाच वर्षाच्या सत्ताकाळात महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये शिवसेनेची एक प्रकारे कुचंबना झाल्याची भावना शिवसैनिकांमधून व्यक्त होत आहे. त्यानंतर आता शिवसेनेला आपल्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करता येणार असल्याने शिवसेना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील हे शिवसेनेत सर्वाधिक (81 हजार) मतांनी निवडून आलेले उमेदवार आहेत. शिवाय ते युवासेनेचे मागच्या कार्यकाळातील एकमेव आमदार आहेत. तसेच त्यांचे युवसेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्याशी जवळचे संबंध असून, या पार्श्वभूमीवर त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते, अशी शक्यता आहे. यासंबंधी खासदार संजय जाधव यांनी निवडणुकी दरम्यान शक्यता व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांना देखील याचा मोठा आनंद झाल्याचे दिसून येते. त्यांच्यासह खासदार हेमंत गोडसे आणि इतर काही खासदारांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानाबाहेर ढोलताशाच्या गजरात जल्लोष केला. फटाके फोडून आतषबाजी देखील केली. एकूणच शिवसेनेत सध्या आनंदमय वातावरण असल्याचे दिसून येते.
दरम्यान, उद्या (गुरुवारी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीनंतर परभणी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जल्लोष करणार असल्याचे सांगण्यात येते.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- pbn_mp_jadhav_delhi_jallosh_visConclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.