ETV Bharat / state

परभणी जिल्ह्यात 'या' तारखेला वाजणार शाळेतील घंटा; जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आदेश - parbhani schools

शाळा सुरू करण्यासाठी अजून अवधी असला तरी पूर्वतयारीसाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची 25 नोव्हेंबरपासून 100 टक्के उपस्थिती आवश्यक आहे. तर महानगरपालिका क्षेत्रातील वर्ग सुरू करण्याबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी या संदर्भातील आदेशात म्हटले आहे.

parbhani distirict collector office
परभणी जिल्हाधिकारी कार्यालय
author img

By

Published : Nov 22, 2020, 6:21 PM IST

परभणी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 6 महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा काही प्रमाणात सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार परभणी महापालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यात प्रथम 10वी व 12वीचे वर्ग 2 डिसेंबरपासून व त्यानंतर टप्याटप्याने 9 वी आणि 11 वीचे वर्ग सुरू करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत.

दरम्यान, शाळा सुरू करण्यासाठी अजून अवधी असला तरी पूर्वतयारीसाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची 25 नोव्हेंबरपासून 100 टक्के उपस्थिती आवश्यक आहे. तर महानगरपालिका क्षेत्रातील वर्ग सुरू करण्याबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी या संदर्भातील आदेशात म्हटले आहे.

शिक्षकांना चाचणी करणे बंधनकारक -

'लॉकडाऊन'च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा कधी सुरू होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज्य शासनाने 23 नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरू कराव्यात, असे निर्देश दिले आहेत. तसेच यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यासाठी धावपळ सुरू केली. मात्र, जिल्ह्यातील शिक्षकांनी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल अजूनही प्राप्त झाले नसल्याने शाळा सुरू करण्याबाबत साशंकता निर्माण होत होती. त्यामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी रविवारी शिक्षण विभागातील अधिकार्‍यांची बैठक घेतली.

हेही वाचा - 'कोरोना नको रे बाबा.. कोरोनाचा अनुभव मी घेतलाय, फार भयानक काम आहे'

शिक्षकांची 25 नोव्हेंबरपासून शाळेत पूर्णवेळ उपस्थित -

जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महापालिका वगळता जिल्ह्यातील सर्व शाळांतील दहावी तसेच महाविद्यालयातील बारावीचे वर्ग दोन डिसेंबरपासून सुरू करावेत. त्यानंतर नववी व अकरावीचे वर्ग सुरू करण्यात येतील. परभणी महानगर पालिकेसह जिल्ह्यातील सर्व शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी 25 नोव्हेंबरपासून शाळेत पूर्णवेळ उपस्थित रहावे. विद्यार्थी उपस्थितीकरिता पालकांचे संमतीपत्र घेणे आवश्यक करण्यात आले आहे. शाळेत प्रत्यक्ष उपस्थिती करिता संमती नसणार्‍या विद्यार्थांकरिता ऑनलाइन वर्ग चालू ठेवावेत, शंभर टक्के शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. 26 नोव्हेंबरपूर्वी संपूर्ण शाळेच निर्जंतुकीकरण करून घ्यावे. त्याचे प्रमाणपत्र गटशिक्षणाधिकार्‍यांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावे, असे निर्देश जिल्ह्यातील शिक्षकांना देण्यात आले आहेत.

शिक्षक पॉझिटिव्ह आढळल्यास 5 दिवस शाळा बंद -

एखाद्या शिक्षक किंवा शिक्षकेत्तर कर्मचार्‍याचा आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास ती शाळा 5 दिवस बंद ठेवण्यात येईल. तसेच निर्जंतुकीकरण करून परत चालू करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक शाळेत हँडवॉश मशीन, थर्मल गन, ऑक्सीमीटर उपलब्ध करणे व पूर्णवेळ कार्यान्वित ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. आठवड्यातून किमान दोनवेळा शाळा निर्जंतुकीकरण करणे हे स्थानिक शाळा व्यवस्थापनाला बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी 2 डिसेंबरपासून मानवविकास बस प्रवास फेर्‍या सुरू कराव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.