ETV Bharat / state

परभणीला पाणी सोडण्यास जालनेकरांचा विरोध, दूधनेचे पात्र कोरडे

लोअर-दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडण्यास जालनेकरांनी विरोध केला आहे. त्यामुळे दूधना नदीपात्र कोरडे पडले आहे. काही दिवसांपूर्वी परभणी जिल्ह्याला लोअर दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासकीय स्तरावर झाला आहे.

दूधना नदीचे पात्र कोरडे
author img

By

Published : May 9, 2019, 11:09 AM IST

परभणी - लोअर-दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडण्यास जालनेकरांनी विरोध केला आहे. त्यामुळे दूधना नदीपात्र कोरडे पडले आहे. काही दिवसांपूर्वी परभणी जिल्ह्याला लोअर दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासकीय स्तरावर झाला आहे. परंतू, या निर्णयाला जालन्यातील काही पुढारी विरोध करू लागले आहेत. सध्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मदार दुधना प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे.

दूधना नदीचे पात्र कोरडे

परभणी जिल्ह्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी लोअर दुधना प्रकल्पातून परभणीसाठी पाणी सोडण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. सोबतच पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. याप्रकरणी परभणीचे माजी पालकमंत्री तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लोअर दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा केला होता. त्यानुसार राज्य शासनाने विभागीय आयुक्तांना पाणी सोडण्याचे आदेशही दिले. 15 मे रोजी 15 टीएमसी पाणी परभणीला सोडण्यात येणार आहे. परंतू, त्यापूर्वीच जालन्यातील काँग्रेसचे माजी आमदार सुरेश जेथलिया तसेच मोहन अग्रवाल या पुढाऱ्यांनी प्रकल्पातून परभणीसाठी पाणी सोडण्यास विरोध केला आहे.

परतुर तालुक्याला पाणी कमी पडेल, असे कारण देत विभागीय आयुक्तांना पाणी न सोडण्याचे निवेदन दिले आहे. दरम्यान, 85 टीएमसी एवढे पाणी असलेल्या लोअर दुधना प्रकल्पातून परभणीला केवळ 15 टीएमसी पाणी सोडायचे आहे. त्याला देखील जालनेकर विरोध करत असल्याने परभणीतील सामान्य नागरिक संताप व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचा देखील या विरोधाला छुपा पाठिंबा असल्याचा आरोप परभणीतील राजकीय मंडळी करत आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे येत्या २ दिवसात प्रकल्पाची स्वतः पाहणी करणार आहेत. त्यानंतर परभणीला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

प्रकल्पग्रस्तांचा जलसमाधीचा इशारा

परतूर परिसरातील लोअर दुधना प्रकल्पात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांनी परभणीसाठी पाणी सोडल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी आज बुधवारी तेथील प्रशासनाला निवेदन दिले आहे.

Intro:परभणी - काही दिवसांपूर्वी परभणी जिल्ह्याला लोअर दुधना प्रकल्पातून सोडण्याचा निर्णय प्रशासकीय स्तरावर झाला आहे. परंतु या निर्णयाला आता जालन्यातील काही पुढारी विरोध करू लागले आहेत. दरम्यान, सध्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मदार दुधना प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून असून जिल्ह्यातून वाहणारी दुधना नदी अक्षरश: कोरडेठाक पडली आहे.Body:परभणी जिल्ह्यातील प्रचंड पाणीटंचाई लक्षात घेऊन परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी लोअर दुधना प्रकल्पातून परभणीसाठी पाणी सोडण्याची मागणी प्रशासनाकडे केली, सोबतच पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. याप्रकरणी परभणीचे माजी पालकमंत्री तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लोअर दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा केला होता. त्यानुसार राज्य शासनाने विभागीय आयुक्तांना पाणी सोडण्याचे आदेशही दिले. 15 मे रोजी 15 टीएमसी पाणी परभणीकडे झेपावणार आहे. परंतु त्यापूर्वीच जालन्यातील काँग्रेसचे माजी आमदार सुरेश जेथलिया तसेच मोहन अग्रवाल या पुढाऱ्यांनी प्रकल्पातून परभणी साठीपाणी सोडण्यास विरोध केला आहे. परतुर तालुक्याला पाणी कमी पडेल, असे कारण देत विभागीय आयुक्तांना पाणी न सोडण्याचे निवेदन दिले. दरम्यान, 85 टीएमसी एवढे पाणी असलेल्या लोअर दुधना प्रकल्पातून परभणीला केवळ 15 टीएमसी पाणी सोडायचे आहे. त्याला देखील जालनेकर विरोध करत असल्याने परभणीतील सामान्य नागरिक संताप व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचा देखील या विरोधाला छुपा पाठिंबा असल्याचा आरोप परभणीतील राजकीय मंडळी करत आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे येत्या दोन दिवसात प्रकल्पाची स्वतः पाहणी करणार आहेत त्यानंतर परभणी ला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

"प्रकल्पग्रस्तांचा जलसमाधीचा इशारा"
परतूर परिसरातील लोअर दुधना प्रकल्पात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांनी परभणीसाठी पाणी सोडल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी आज बुधवारी तेथील प्रशासनाला निवेदन दिले आहे.

- गिरीराज भगत, परभणी
- सोबत :- vis :- कोरडीठाक पडलेल्या दुधना नदीचे झरी येथील पात्र.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.