ETV Bharat / state

भाजपच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; फडणवीस, चंद्रकांत पाटलांच्या प्रतिमांना फासले काळे - ncp vs bjp over corona

परभणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भाजपच्या आंदोलनाचा निषेध करण्यात आला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमांना काळे फासून निषेध आंदोलन करण्यात आले.

parbhani ncp workers agitation against bjp
भाजपच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
author img

By

Published : May 22, 2020, 4:22 PM IST

Updated : May 22, 2020, 8:49 PM IST

परभणी - कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत आज भाजपने राज्यव्यापी 'महाराष्ट्र बचाव' आंदोलन केले. मात्र, या संकटकाळात सरकारला सहकार्य करण्याचे सोडून भाजप आंदोलन करत आहे. त्यामुळे परभणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमांना काळे फासून निषेध आंदोलन करण्यात आले. परभणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

भाजपच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

भाजपने राज्यभर ठाकरे सरकार कोरोनाच्या संकटात कोणत्याही उपाययोजना करत नसल्याचा आरोप करत आंदोलन सुरू केले. याच आंदोलनाचा निषेध करत दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करत भाजपला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. परभणी शहरातील वसमत रोडवरील राष्ट्रवादी भवनसमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप पक्षासह विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचा जाहीर निषेध व्यक्त केला.

parbhani ncp workers agitation against bjp
भाजपच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

कोरोना सारख्या आपत्ती काळात या भाजपने सरकारला मदत करायला हवी असे मत व्यक्त सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्या या दोन्ही नेत्यांच्या फोटोला काळे लावून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच भाजपच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के, तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, महिला अध्यक्ष नंदा राठोड, युवक जिल्हाध्यक्ष रितेश काळे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

Last Updated : May 22, 2020, 8:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.