ETV Bharat / state

सरसकट मदत द्या, अन्यथा आंदोलन करू; आमदार राहुल पाटील यांचा इशारा - परभणी आमदार राहुल पाटील शेती पाहणी दौरा

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये परतीच्या पावसामुळे खरिपाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट दिली. यावेळी, शेतकऱ्यांना मदत जाहीर करताना कृषी विभागाच्या '22 मे 2019' च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून सरसकट सर्व शेतकर्‍यांना त्वरित मदत जाहीर करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

परभणी आमदार राहुल पाटील शेती पाहणी दौरा
author img

By

Published : Nov 3, 2019, 8:12 AM IST

परभणी - परतीच्या पावसाने खरिपाचे हाती आलेले पीक वाया गेल्याने परभणी जिल्ह्यातील शेतकरी वर्ग पुरता हवालदिल झाला आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना मदत जाहीर करताना कृषी विभागाच्या '22 मे 2019' च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी. त्यानुसार, सरसकट सर्व शेतकर्‍यांना त्वत्काळ मदत जाहीर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिला.

परभणी आमदार राहुल पाटील शेती पाहणी दौरा
पिकांच्या नुकसानीची पाहणी करताना आमदार डॉ.राहुल पाटील, डेप्युटी सीईओ मंजुषा कापसे, तहसीलदार विद्याचरण कडवकर, गंगाप्रसाद आनेराव

पाटील यांनी परभणी तालुक्यातील झरी व पिंगळी मंडळांतर्गत येणाऱ्या टाकळी कुंभकर्ण, झरी, असोला व उखळद या गावातील शेतांचा काल (शनिवारी) प्रत्यक्ष पाहणीचा दौरा केला. यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 11.2 प्रमाणे 25 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास वैयक्तिक पंचनामे न करता गावनिहाय नमुना सर्वेक्षण करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच प्रत्यक्षात 80 टक्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्याने मंडळातील सर्व गावांचे नमुना सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांच्याकडे केली असल्याचे सांगितले.

यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, तहसीलदार विद्याचरण कडावकर, तालुका कृषी अधिकारी पी. बी. बनसोडे, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव, उपजिल्हाप्रमुख सदाशिव देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सोपानराव अवचार आदी उपस्थित होते.

हेही वाचा : प्रधानमंत्री पीक विमा नव्हे, कार्पोरेट कल्याण योजना - राजू शेट्टी

Intro:परभणी : परतीच्या पावसाने परभणी जिल्ह्यातील खरिपाचे हाती आलेले पीक गेल्याने शेतकरीवर्ग पुरता हवालदिल झाला आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना मदत जाहीर करताना कृषी विभागाच्या 22 मे 2019 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून सरसकट सर्व शेतकर्‍यांना त्वरित मदत जाहीर करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार डॉ.राहुल पाटील यांनी दिला.Body:
परभणी तालुक्यातील झरी व पिंगळी मंडळांतर्गत येणाऱ्या टाकळी कुंभकर्ण, झरी, असोला व उखळद या गावातील शेतांचा आज (शनिवारी) प्रत्यक्ष पाहणीचा दौरा त्यांनी प्रशासकीय यंत्रणासोबत केला. यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 11.2 प्रमाणे 25 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास वैयक्तिक पंचनामे न करता गावनिहाय नमुना सर्वेक्षण करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच प्रत्यक्षात 80 टक्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्याने मंडळातील सर्व गावांचे नमुना सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांच्याकडे केली असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, तहसीलदार विद्याचरण कडावकर, तालुका कृषी अधिकारी पी.बि. बनसोडे, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव, जिल्हा परिषद सदस्य गजानन देशमुख, उपजिल्हाप्रमुख सदाशिव देशमुख, तालुका प्रमुख नंदकुमार आवचार, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सोपानराव अवचार, संदीप झाडे, गुणाजी अवकाळे, विश्वास कराळे, अरविंद देशमुख, शरद रसाळ, गुणाजी अवकाळे, सुभाष माने, रवि चन्नावार, माऊली मोहिते आदी उपस्थित होते.

- गिरीराज भगत, परभणी
- सोबत :- फोटो
परभणी - पिकांंच्या नुकसानीची पाहणी करताना आमदार डॉ.राहुल पाटील, डेप्युटी सीईओ मंजुषा कापसे, तहसीलदार विद्याचरण कडवकर, गंगाप्रसाद आनेराव.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.