ETV Bharat / state

परभणी लोकसभा मतदार संघात ५४ केंद्रे संवेदनशील; दिव्यांगांसाठी खास व्यवस्था - voter

परभणी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात (१८ एप्रिल) ला होणार आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच २६ मार्चपर्यंत नवीन मतदारांना नाव नोंदणी करता येणार आहे. मतदार यादीतील पडताळणी संदर्भात १९५० हा टोल फ्री क्रमांक असून जिल्हाधिकारी कार्यालयात देखील २२६४०० हा कंट्रोल रुम नंबरही तक्रारींसाठी कार्यान्वित करण्यात आला आहे.

परभणी
author img

By

Published : Mar 12, 2019, 4:21 PM IST

परभणी - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक आयोगही तयारीला लागली आहे. परभणी लोकसभा मतदारसंघाच्या एकूण २ हजार १६४ पैकी ५४ मतदार केंद्रे संवेदनशील आहेत. या मतदान केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शिवाय निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांचे हद्दपारीचे प्रस्ताव निकाली काढण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. मतदान केंद्रांवर दिव्यांगासाठी विशेष सुविधा उपलब्ध केल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी दिली.

परभणी

जिल्हाधिकारी शिवाशंकर म्हणाले, परभणी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात (१८ एप्रिल) ला होणार आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच २६ मार्चपर्यंत नवीन मतदारांना नाव नोंदणी करता येणार आहे. मतदार यादीतील पडताळणी संदर्भात १९५० हा टोल फ्री क्रमांक असून जिल्हाधिकारी कार्यालयात देखील २२६४०० हा कंट्रोल रुम नंबरही तक्रारींसाठी कार्यान्वित करण्यात आला आहे.

आचारसंहिता भंगाच्या तक्रारींवर निवडणूक विभाग तातडीने कारवाई करणार आहे. यासाठी सी व्हीजिल नावाचे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपद्वारे तक्रारी करण्यात येणार आहेत. राजकीय पक्षांच्या खर्च नोंदणीस आचारसंहिता लागू झाल्यापासून सुरुवात झाली आहे. उमेदवारांना दैनंदिन खर्चाची नोंद नामनिर्देशनपत्र दाखल झाल्यापासून द्यावी लागणार आहे. प्रत्येक उमेदवाराला ७० लाख रुपयापर्यंत खर्च करता येणार आहे. यासाठी त्यांना स्वतंत्र बँक खाते उघडावे लागणार आहे. जिल्ह्यातील बँक अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आहे. बँकेतून १ लाख रुपयावर रक्कम काढली जात असेल तर त्याची माहिती निवडणूक विभागाला देण्यास सांगण्यात आले आहे. सर्व मतदान केंद्रांवर अपंगांसाठी स्वतंत्र रॅम्प तयार करण्यात येणार आहे. मागणीनुसार त्यांना वाहने सुद्धा दिली जातील, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

तसेच आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मतदारसंघात २२ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. १५ व्हिडिओ सहनिरीक्षण पथक नियुक्त करण्यात आले आहेत. १८ स्थिर नियंत्रण पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. व्हिडिओ चित्रीकरण तपासण्यासाठी ४ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ११ आचारसंहिता पथके स्थापण्यात आली आहेत. खर्चाची पडताळणी करण्यासाठी ४ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी ४ खर्च सहाय्यक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या शिवाय २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी ४८ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ३ गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा झाली आहे. २६ प्रकरणांमध्ये संबंधित आरोपींना निर्दोष सोडण्यात आले आहे. १२ प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. ३ प्रकरणात ए. बी. फायनल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवडणूक उपजिल्हाधिकारी महादेव किरवले आदींची उपस्थिती होती.
मतदार यादीमध्ये दुबार नावे आल्यासंदर्भात काँग्रेस पक्षाने केलेल्या तक्रारीतील ४५ हजार ९३ नावांपैकी ४२ हजार ८३८ नावांची पडताळणी करण्यात आली आहे. त्यामध्ये १० हजार ८४९ मतदारांच्या मतदान कार्डावरील छायाचित्र एक सारखेच असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती जिल्हाधिकारी शिवाशंकर यांनी दिली. या तक्रारीतील २ हजार २५५ मतदारांची पडताळणी करणे बाकी आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यांतर कोणतेही नाव यादीतून वगळता येत नाही. यामुळे या दुबार नावांची बीएलओ स्तरावर घरोघरी जावून तपासणी करण्यात येणार आहे व त्याच व्यक्ती आहेत का? याची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण करुन ठेवण्यात येणार आहे. पुढील कारवाई निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.

Intro:
परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या एकूण २ हजार १६४ पैकी ५४ मतदार केंद्रे संवेदनशील आहेत. या मतदान केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शिवाय निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांचे हद्दपारीचे प्रस्ताव निकाली काढण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. दरम्यान, मतदान केंद्रांवर दिव्यांगांच्या सोयी साठी विशेष सुविधा उपलब्ध केल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी पी.शिवाशंकर यांनी दिली. Body:लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी पत्रकार परिषद घेतली. पुढे ते म्हणाले, परभणी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक दुसऱ्या टप्यात म्हणजेच १८ एप्रिल रोजी होणार असल्याने नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच २६ मार्चपर्यंत नवमतदारांना नाव नोंदणी करता येणार आहे. मतदार यादीतील पडताळणी संदर्भात १९५० हा टोल फ्री क्रमांक असून जिल्हाधिकारी कार्यालयात देखील २२६४०० हा कंट्रोल रुम नंबरही तक्रारींसाठी कार्यान्वित करण्यात आला आहे. आचारसंहिता भंगाच्या तक्रारींवर निवडणूक विभाग तातडीने कारवाई करणार असून यासाठी सी व्हीजिल नावाचे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपद्वारे तक्रारी करण्यात येणार आहेत. राजकीय पक्षांच्या खर्च नोंदणीस आचारसंहिता लागू झाल्यापासून सुरुवात झाली आहे. उमेदवारांना दैनंदिन खर्चाची नोंद नामनिर्देशनपत्र दाखल झाल्यापासून द्यावी लागणार असून प्रत्येक उमेदवाराला ७० लाख रुपयापर्यंत खर्च करता येणार आहे. यासाठी त्यांना स्वतंत्र बँक खाते उघडावे लागणार आहे. जिल्ह्यातील बँक अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली असून बँकेतून १ लाख रुपयाच्यावर रक्कम काढली जात असेल तर त्याची माहिती निवडणूक विभागाला देण्यास सांगण्यात आले आहे. सर्व मतदान केंद्रांवर अपंगांसाठी स्वतंत्र रॅम्प तयार करण्यात येणार आहे. मागणीनुसार त्यांना वाहने सुद्धा दिली जातील, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
तसेच आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मतदारसंघात २२ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून १५ व्हिडिओ सहनिरीक्षण पथक नियुक्त करण्यात आले आहेत. १८ स्थिर नियंत्रण पथकांची नियुक्ती करण्यात आली असून व्हिडिओ चित्रीकरण तपासण्यासाठी चार पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ११ आचारसंहिता पथके स्थापन्यात आली आहेत. खर्चाची पडताळणी करण्यासाठी ४ पथकांची स्थापना करण्यात आली असून यासाठी ४ खर्च सहाय्यक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या शिवाय २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी ४८ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ३ गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा झाली असून २६ प्रकरणांमध्ये संंबंधित आरोपींना निर्दोष सोडण्यात आले आहे. १२ प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. ३ प्रकरणात ए. बी. फायनल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवडणूक उपजिल्हाधिकारी महादेव किरवले आदींची उपस्थिती होती.

"त्या तक्रारीत तथ्य..! ; 11 हजार दुबार नावे"

दरम्यान, मतदार यादीमध्ये दुबार नावे आल्यासंदर्भात काँग्रेस पक्षाने केलेल्या तक्रारीतील ४५ हजार ९३ नावांपैकी ४२ हजार ८३८ नावांची पडताळणी करण्यात आली आहे. त्यामध्ये १० हजार ८४९ मतदारांच्या मतदान कार्डावरील छायाचित्र एक सारखेच असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी दिली. या तक्रारीतील २ हजार २५५ मतदारांची पडताळणी करणे बाकी आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यांतर कोणतेही नाव यादीतून वगळता येत नाही. यामुळे या दुबार नावांची बीएलओस्तरावर घरोघरी जावून तपासणी करण्यात येणार आहे व त्याच व्यक्ती आहेत का? याची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण करुन ठेवण्यात येणार आहे. पुढील कारवाई निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.
- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत : जिल्हाधिकारी bite & कार्यालय visConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.