ETV Bharat / state

परभणीच्या शासकीय रुग्णालयातील महिला कर्मचारी 'कोरोना पॉझिटिव्ह'; एकूण रुग्णसंख्या 102 वर

परभणी जिल्हा रुग्णालयात 5 संशयित दाखल झाले असून एकूण संशयितांची संख्या 2 हजार 613 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 हजार 587 जणांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 80 अनिर्णायक तर 47 स्वॅबची तपासणी आवश्यक नसल्याचा अहवाल नांदेड प्रयोगशाळेद्वारे प्राप्त झाला आहे.

author img

By

Published : Jun 25, 2020, 10:57 AM IST

parbhani civil hospital
परभणी जिल्हा रुग्णालय

परभणी - येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील महिला कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. बुधवारी रात्री उशीरा प्राप्त झालेल्या अहवालात ही बाब स्पष्ट झाली असून, यापूर्वी देखील जिल्हा रुग्णालयातील एक महिला कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. दरम्यान, बुधवारी दिवसभरात इतर 3 रुग्ण आढळले असून, जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 102 वर पोहचली आहे.

विशेष म्हणजे परदेशवारी करून परभणीत परतलेल्या पाच व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आला आहेत. मात्र, कुठल्याही परजिल्ह्याचा प्रवास न करणाऱ्या परभणी शहरातील इतर 3 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. ज्यामध्ये शहरातील इक्बालनगरातील 60 वर्षीय पुरुष व अपना काॅनर आणि गव्हाणे रस्त्यावरील दोन महिलांचा समावेश आहे. त्या पाठोपाठ रात्री उशिरा चौथा कोरोनाबाधित रूग्ण आढळला आहे. ज्यामध्ये जिल्हा शासकीय रूग्णालयातील एक महिला कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह आढळली आहे. यापूर्वी देखील जिल्हा रुग्णालयातील एक महिला कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आली होती.

जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पुरेशी साधन सामग्री व संरक्षण कीट उपलब्ध होत नसल्याची ओरड यापूर्वीदेखील झाली आहे. कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सकांना घेराव घालून, सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. मात्र, अद्यापही कर्मचाऱ्यांना परिपूर्ण साहित्य उपलब्ध झालेले नाही. परिणामी महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, काल जिल्हा रुग्णालयात 5 संशयित दाखल झाले असून एकूण संशयितांची संख्या 2 हजार 613 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 हजार 587 जणांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 80 अनिर्णायक तर 47 स्वॅबची तपासणी आवश्यक नसल्याचा अहवाल नांदेड प्रयोगशाळेद्वारे प्राप्त झाला आहे. शिवाय बुधवारी 8 जणांचे स्वॅब नांदेड येथील प्रयागेशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर विलगीकरण कक्षात 105 रुग्ण असून, यापूर्वी 2 हजार 503 जणांनी विलगीकरणाच्या 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे. शिवाय सध्या परिस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या 102 वर जाऊन पोहोचली असून, त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 90 जणांना कोरोनामुक्त झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे. ज्यामुळे परभणीच्या कोरोना रुग्णालयात 8 रुग्ण उपचार घेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.