ETV Bharat / state

देशात पेट्रोल-डिझेलचे सर्वाधिक दर परभणीत; उपाययोजना करण्याची नागरिकांमधून मागणी - परभणी पेट्रोल दर न्यूज

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतच चालल्या आहेत. कोरोना काळात पेट्रोल-डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. राज्यातील सात जिल्ह्यामध्ये डिझेलचे दर 80 रुपयांच्या वर गेले आहेत. परभणीत देशात सर्वाधिक महाग पेट्रोल असल्याचे समोर आले आहे.

पेट्रोल डिझेल दर न्यूज
पेट्रोल डिझेल दर न्यूज
author img

By

Published : Dec 5, 2020, 8:58 PM IST

परभणी - देशातील सर्वाधिक इंधनाचे दर परभणीत असतात. साहजिकच इंधन दरवाढीचा सर्वाधिक फटका शहरातील नागरिकांना बसतो. देशात इंधनाचे दर वाढल्यानंतर शहरात आज 92.16 रुपये प्रति लिटर पेट्रोलचा दर आहे. हा देशातील सर्वाधिक पेट्रोलचा दर आहे.

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतच चालल्या आहेत. कोरोना काळात पेट्रोल-डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. राज्यातील सात जिल्ह्यामध्ये डिझेलचे दर 80 रुपयांच्या वर गेले आहेत. परभणीत देशात सर्वाधिक महाग पेट्रोल असल्याचे समोर आले आहे. शहरात आज (शनिवारी) तब्बल 92.16 रुपये प्रति लिटर पेट्रोलचा दर आहे. त्यामुळे 'जगात जर्मनी भारतात परभणी' उगाच नाही म्हणत, असे म्हण्याची वेळ वाहनधारकांवर आली आहे. टाळेबंदीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत महागडे इंधन घेणे परवडत नसल्याच्या प्रतिक्रिया ग्राहकांनी दिल्या आहेत.

देशात पेट्रोल-डिझेलचे सर्वाधिक दर परभणीत
'परभणीत पेट्रोल 92.16 रुपये तर डिझेल 81.05'सरकारी तेल कंपन्यांनी डिझेल-पेट्रोलच्या किंमती वाढविल्याचे जाहीर केले आहे. डिझेलच्या दरात 18 ते 20 पैशांची वाढ झाली आहे. तर पेट्रोलचे दर 15 ते 17 पैशांने वाढले आहेत. राज्यातील तब्बल 19 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मुंबई शहरामध्ये डिझेलची किंमत 24 पैशांनी वाढून 79.66 रुपये आहे. त्याचप्रमाणे पेट्रोलच्या किंमतीही 19 पैशांनी वाढल्या आहेत. नागपूर , परभणी, नांदेड, सोलापूर, अमरावती, औरंगाबाद आणि बुलढाणा या जिल्ह्यात डिझेलच्या किंमत प्रति लिटर 80 रुपयांहून जास्त आहे. परभणीत पेट्रोलचा दर सर्वाधिक 92.16 रुपये तर डिझेल 81.05 एवढा आहे.'9 दिवसांमध्ये डिझेलमध्ये 1 रुपया 76 पैसे दरवाढ'मागील काही दिवसांत राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने आहे. यापूर्वी 25 नोव्हेंबरला 77 रुपये 9 पैसे प्रति लिटर दर असणारे डिझेल आज 79 रुपये 66 पैसे इतके झाले आहे. मागील 9 दिवसांमध्ये डिझेलचा दर 1 रुपया 76 पैसे इतका वाढला आहे. मुंबईत मागील काही दिवसांपासून डिझेलच्या किंमतीत होणारी दरवाढ ही आता 80 रुपयांपर्यंत येऊन पोहचली आहे, तर दुसरीकडे पेट्रोलच्या किंमतीमध्येदेखील सातत्याने दरवाढ सुरूच आहे. 'परभणीकरांमध्ये संताप' कोरोना महामारीत अनेकांच्या उद्योग, व्यवसाय व नोकरीवर परिणाम झाला आहे. त्यात इंधनाचे दर वाढल्याने वाहनधारकांनी वाहने चालवावी की नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. अनेक लहान-मोठे उद्योग वाहनांवर अवलंबून असतात. मात्र, त्या व्यवसायाचे निम्मे उत्पन्न इंधनावर खर्च होत असल्याने व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. परभणीतच दर का वाढलेले असतात? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. 'इंधन डेपो दूर असल्याने बसतो फटका'

इंधनाचा पुरवठा करणारे डेपो दूर असल्याने परभणीत इंधन महाग-
परभणी जिल्ह्यात मनमाड आणि सोलापूर आदी भागातून इंधनाचा पुरवठा होत असतो. या दोन्ही ठिकाणचे डेपो परभणीपासून जवळपास तीनशे ते चारशे किलोमीटर दूर आहेत. परभणीत येणाऱ्या इंधनासाठी वाहतूक खर्च सर्वाधिक आहे. हा खर्च सरकारी तेल कंपन्या पेट्रोल पंप चालकांकडून तर पेट्रोल पंप चालक हे ग्राहकांकडून वसूल करतात. त्यामुळे परिसरातील जिल्ह्यांसाठी या ठिकाणी इंधन डेपो उभारावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र याकडे सरकार नेहमीच दुर्लक्ष करताना दिसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.