ETV Bharat / state

सोनपेठजवळ कार अपघातात एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी - सोनपेठ कार अपघात मृत्यू

सोनपेठच्या निळा पाटीजवळ आज इंडिगो आणि स्कार्पिओ गाडीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर, दोघे गंभीर जखमी झाले.

Accident
अपघात
author img

By

Published : Sep 16, 2020, 5:12 PM IST

परभणी : परळी-गंगाखेड रोडवरील निळा पाटीजवळ दोन गाड्यांचा अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर, दोघे जखमी झाले. आज दुपारी ही घटना घडली. जखमी झालेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
परळी येथील रहिवासी खिजर खान हे त्यांच्या दोन सहकाऱ्यांसह इंडिगो कारने आज दुपारी परळीकडे जात होते. त्यांची गाडी सोनपेठ तालुक्यातील निळा पाटीजवळ पोहचताच समोरून भरधाव येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीने त्यांना धडक दिली. या अपघातात इंडिगो गाडीमधील एकाचा जागीच मृत्यू झाला तर, अन्य दोघे गंभीर जखमी झाले. त्या दोघांनाही गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.