ETV Bharat / state

परभणीत एकही कोरोनाग्रस्त नाही; घरपोच सेवा देण्याचे पालकमंत्री नवाब मलिकांचे आवाहन

जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा द्यावी, असे आदेश आपण प्रशासनाला दिले असून या दृष्टिकोनातून प्रशासनही पाऊले उचलत असल्याची माहिती पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

author img

By

Published : Mar 23, 2020, 9:20 AM IST

Updated : Mar 23, 2020, 10:00 AM IST

parbhani
पालकमंत्री नवाब मलिक

परभणी - सद्यस्थितीला काही संशयितांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरी त्यापैकी एकही रुग्ण कोरोनाग्रस्त नाही, त्यामुळे परभणीकरांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र, कोरोना या संसर्गजन्य आजारांचा सामना करण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडू नये, त्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा द्यावी, असे आदेश आपण प्रशासनाला दिले असून या दृष्टिकोनातून प्रशासनही पाऊले उचलत असल्याची माहिती पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

परभणीत एकही कोरोनाग्रस्त नाही

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी रविवारी सायंकाळी सावली विश्रामगृह येथे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन संबंधित अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. तसेच या दरम्यान त्यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन विलगीकरण कक्षाच्या व्यवस्थेची देखील पाहणी केली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, महानगरपालिका आयुक्त रमेश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बालासाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकरराव देशमुख, महानगरपालिका आरोग्य विभागप्रमुख डॉ. कल्पना सावंत, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, तहसिलदार विद्याचरण कडवकर उपस्थित होते.

यावेळी त्यांनी जिल्ह्यातील एकूणच परिस्थितीची माहिती संबंधितांकडून घेतली. मलिक यांनी 'परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे, सार्वजनिक वितरण व्यवस्था विस्कळित होवू नये, दुध, भाजीपाला, औषधी नागरिकांना घरपोच देण्याची व्यवस्था करावी, यासाठी पथके तयार करावीत. जेणेकरून गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आदेश दिले.

या दौऱ्यात नवाब मलिक यांनी रुग्णांची विचारपूस करत औषधीच्या साठ्याबाबत माहिती घेतली. तर, कुठल्याही प्रकारची औषधे कमी पडू देणार नाही, असे त्यांनी सांगितले. तर, शिवभोजन थाळीची संख्या वाढवण्याबाबतही संबंधितांना सूचना केली. तसेच नागरिकांनी सर्व बाबींची नोंद घ्यावी. स्वतःची व आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.

Last Updated : Mar 23, 2020, 10:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.