ETV Bharat / state

परभणीतील राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांना मारहाण; एकाला अटक - आमदार बाबाजानी दुर्राणी

परभणी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा विधानपरिषद आमदार बाबाजानी दुर्राणी (MLA Babjani Durrani )यांना पाथरीत एका व्यक्तीने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देखील दिल्याची तक्रार दुर्राणी यांनी नोंदवली आहे. अंत्यसंस्कार कार्यक्रमात उपस्थित असलेल्या आमदारावर एका व्यक्तीने हल्ला केला तसेच पिस्तुल असते तर गोळ्या घातल्या असत्या अशी धमकी दिली.

MLA Babjani Durrani
MLA Babjani Durrani
author img

By

Published : Nov 19, 2021, 3:03 PM IST

परभणी - येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा विधानपरिषद सदस्य आमदार बाबाजानी दुर्राणी (MLA Babjani Durrani ) यांना पाथरीत एका व्यक्तीने मारहाण केली. (Attack on mla babajani durani) तसेच जीवे मारण्याची धमकी देखील दिल्याची तक्रार दुर्राणी यांनी नोंदवली आहे. त्यानुसार पोलिसांनी संबंधित व्यक्तीला अटक केली आहे.

अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात घडली घटना -

आमदार दुर्राणी हे गुरुवारी (18 नोव्हेंबर) पाथरी शहरातील एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारास उपस्थित होते. या ठिकाणी ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दत्तराव मायंदळे, बखियार खान व शेख जुबेरबिन यांच्याबरोबर चर्चा करीत होते. त्यावेळी मोहम्मद बिन किलेब नामक व्यक्ती अचानक त्यांच्या समोर आली. त्या व्यक्तीने आमदार दुर्राणी यांच्यावर हल्ला केला. चापट बुक्क्यांनी त्यांना मारहाण केली. मात्र, दुर्राणी यांच्या समर्थकांनी तातडीने त्यास ताब्यात घेतले.

पिस्तूल असते तर गोळ्या घातल्या असत्या -

दरम्यान आमदार दुर्राणींना मारहाण करणारा मोहम्मद बिन यांनी मारहाण करताना जीवे मारण्याची धमकी देखील दिली. यावेळी त्याने 'आपल्याकडे पिस्तूल असते तर गोळ्या घातल्या असत्या', असे ओरडत धमकावले.

गुन्हा दाखल, आरोपीस अटक -

दरम्यान, आमदार दुर्राणी यांनी मोहम्मद बिन किलेब याच्या विरोधात पाथरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्यास तातडीने ताब्यात घेतले. दरम्यान, दुर्राणी समर्थकांनी पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली. या प्रकाराने पाथरीत काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे आमदार दुर्राणी यांनी समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.