ETV Bharat / state

स्मशानशांतता भंगली सनई-चौघड्यांच्या निनादाने, थाटात पार पडला विवाह - स्मशानभूमी

जिंतूर शहरातील जैन स्मशानभूमीत 10 वर्षांपासून चौकीदार म्हणून विठ्ठल जाधव काम करतात. त्यांची मुलगी सुमित्रा हिचे लग्न शिर्डी तालुक्यातील कोल्हार येथील गोविंद गणेश गायकवाड यांच्याशी जुळले होते. सामान्य माणसाच्या मनातील स्मशानभूमी विषयीची भीती घालवण्यासाठी आपल्या मुलीचे लग्न जाधव यांनी पालिकेच्या सार्वजनिक वैकुंठ स्मशानभूमीत करण्याचे ठरवले. त्यांच्या या निर्णयाला वर पिता गणेश गायकवाड यांनीही सहमती दर्शवली.

marriage
स्मशानशांतता भंगली सनई-चौघड्यांच्या निनादाने, थाटात पार पडला विवाह
author img

By

Published : Feb 29, 2020, 12:28 PM IST

Updated : Feb 29, 2020, 12:42 PM IST

परभणी - आयुष्यातल्या शुभ आणि महत्वाच्या कार्यांपैकी एक म्हणजे लग्न. मग या शुभकार्याला ठिकाणही तसेच निवडण्याची प्रथा आहे. मात्र, जिंतूरच्या मसणजोगी कुटुंबाने आपल्या मुलीचा विवाह चक्क स्मशानभूमीत लावून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. स्मशानभुमी म्हटले की अनेकांचा भीतीने थरकाप उडतो. अशाच एका स्मशानभूमीत घुमलेला सनई-चौघड्यांचा नाद सर्वांनाच आश्चर्यासोबतच सुखद धक्का देऊन गेला.

स्मशानशांतता भंगली सनई-चौघड्यांच्या निनादाने, थाटात पार पडला विवाह

जिंतूर शहरातील जैन स्मशानभूमीत 10 वर्षांपासून चौकीदार म्हणून विठ्ठल जाधव काम करतात. त्यांची मुलगी सुमित्रा हिचे लग्न शिर्डी तालुक्यातील कोल्हार येथील गोविंद गणेश गायकवाड यांच्याशी जुळले होते. सामान्य माणसाच्या मनातील स्मशानभूमी विषयीची भीती घालवण्यासाठी आपल्या मुलीचे लग्न जाधव यांनी स्मशानभूमीत करण्याच ठरवले. परंतु, ते राहत असलेली जैन समाजाची स्मशानभूमी लहान असल्याने त्यांनी पालिकेच्या सार्वजनिक वैकुंठ स्मशानभूमीत लग्न सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला वर पिता गणेश गायकवाड यांनीही सहमती दर्शवली.

हेही वाचा - हृदयद्रावक : मुलाची 'ती' आर्त हाक वडिलांनी ऐकलीच नाही

ठरल्याप्रमाणे गुरुवारी गणेश गायकवाड हे आपल्या मुलाची वरात घेऊन वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आले. तत्पूर्वी, जाधव यांनी लग्नपत्रिका छापून अनेक मान्यवरांना लग्नाचे निमंत्रण दिले होते. परंतु स्मशानभूमीच्या भीतीपोटी बरीच मंडळी लग्नाला आली नाही. उपस्थित आप्तस्वकीयांच्या साक्षीने या लग्न सोहळ्याला सुरुवात झाली. नवरदेवाने मारोतीचे दर्शन घेऊन आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. लग्नकार्याचा विधी सोमेश्वर संतोष स्वामी यांनी केला. त्यानंतर दहन वाहिनीसमोरील पटांगणात आणि अंत्यसंस्कार करण्यासाठीच्या ओट्यासमोरील हिरवळीवर जेवणाच्या पंगती बसल्या. जे आजही अंधश्रद्धेतून बाहेर पडले नाहीत, त्यांच्यासाठी डोळे उघडणारे हे दृश्य होते.

हेही वाचा - मराठा आरक्षणाबाबत उपसमितीची बैठक; १७ मार्चला सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

स्मशानभूमीमध्ये अथवा स्मशानभूमीजवळून जाण्याची वेळ आली, तर अनेकांचा थरकाप उडतो, भीती वाटते. देवाचे नामस्मरण करूनच ते या परिसरात वावरतात. अशा या परिसरातील स्मशान शांततेत मसणजोगी कुटुंबीय राहतात. त्यामुळे हा सोहळा त्यांच्यासाठी जरी सहज वाटणारा कार्यक्रम असला तरी समाजाला मात्र अंधश्रद्धा निर्मुलनाचे धडे देणारा ठरला.

Last Updated : Feb 29, 2020, 12:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.