ETV Bharat / state

'मराठा क्रांती मोर्चा' काढणार परभणीतून आरक्षण रथयात्रा; आंदोलनाच्या पुनर्बांधणीचा निश्चय

author img

By

Published : Dec 5, 2020, 6:22 PM IST

Updated : Dec 5, 2020, 6:46 PM IST

'मराठा क्रांती मोर्चा'चे समन्वयक सुभाष जावळे म्हणाले, की मराठा समाज कुठल्याही जातीच्या विरोधात जाऊन आरक्षण मागत नाही. तर मराठा समाज हा त्यांच्या हक्काचे आरक्षण मागत आहे. रथयात्रेच्या माध्यमातून मराठा समाजामध्ये आलेली मरगळ झटण्याचे काम होणार आहे.

मराठा आंदोलनाच्या पुनर्बांधणीचा निश्चय
मराठा आंदोलनाच्या पुनर्बांधणीचा निश्चय

परभणी - मराठा क्रांती मोर्चा ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रथयात्रा काढणार आहे. यानंतर ही रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहे. आरक्षणाबाबत खेळ्या करणाऱ्यांना उघडे पाडण्यासाठी ही रथयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती 'मराठा क्रांती मोर्चा'चे समन्वयक सुभाष जावळे यांनी दिली.

'मराठा क्रांती मोर्चा'चे समन्वयक सुभाष जावळे म्हणाले, की मराठा समाज कुठल्याही जातीच्या विरोधात जाऊन आरक्षण मागत नाही. तर मराठा समाज हा त्यांच्या हक्काचे आरक्षण मागत आहे. रथयात्रेच्या माध्यमातून मराठा समाजामध्ये आलेली मरगळ झटण्याचे काम होणार आहे.

शहरातील अतिथी सभागृह येथे सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जावळे बोलत होते. 7 तारखेला विधानसभेवर काढण्यात येणार मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. मात्र, या बैठकीत पुढील दिशा ठरविण्यात आल्याचे जावळे यांनी सांगितले.

'मराठा क्रांती मोर्चा' काढणार परभणीतून आरक्षण रथयात्रा
हेही वाचा-सकल मराठा समाज : 'पक्ष सोडून कोणत्याही नेत्यांनी आमच्यासोबत यावं'

'संबंध महाराष्ट्रात काढण्यात येणार रथयात्रा'
मराठा समाज आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करण्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण भागात भव्य रथयात्रा काढण्यात येणार आहे. त्या बद्दलचे नियोजन या बैठकीत करण्यात आले.

हेही वाचा-मराठा आरक्षण: स्थिगिती हटविण्याच्या सरकारच्या अर्जावर ९ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

'दिल्लीच्या सीमेवर जाऊन लढावं लागते की काय?
'मराठा क्रांती मोर्चा'चे समन्वयक सुभाष जावळे म्हणाले, की ग्रामीण भागात संदेश देण्यासाठी ही रथयात्रा काढण्यात येणार आहे. या माध्यमातून इतर कोणाचेही आरक्षण काढून घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी आमची भावना नाही. मात्र मराठा समाजाचा तरुण नैराश्यग्रस्त झाला आहे. आरक्षण नसल्याने त्यांना नोकऱ्यांमध्ये स्थान नाहीय. पैसा नसल्याने ग्रामीण भागातील तरुणांना शिक्षण मिळत नाही. अशीच परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यामुळे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर जाऊन लढत आहेत. तशीच लढाई आम्हाला देखील करावी लागते की काय ? असा प्रश्न आम्हाला पडल्याचेही जावळे यावेळी म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयात 9 डिसेंबरला सुनावणी-

मराठा आरक्षणावरील स्थगिती हटविण्यासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी (9 डिसेंबर) सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणावर पहिल्यांदाच पाच सदस्यीय घटनापीठसमोर सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणावरील स्थगिती हटविण्यासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी (9 डिसेंबर) सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणावर पहिल्यांदाच पाच सदस्यीय घटनापीठसमोर सुनावणी होणार आहे.

Last Updated : Dec 5, 2020, 6:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.