ETV Bharat / state

सरकारचे वकील सर्वोच्च न्यायालयात गैरहजर; परभणीत मराठा क्रांती मोर्चाचे जोरदार निदर्शने - मराठा क्रांती मोर्चा बातमी

राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर फारसे गंभीर नसल्याचा आरोप करत परभणीत सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज (मंगळवारी) परभणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.

maratha kranti morcha
परभणीत मराठा क्रांती मोर्चाचे जोरदार निदर्शने
author img

By

Published : Oct 27, 2020, 6:01 PM IST

परभणी - राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर फारसे गंभीर नसल्याचा आरोप करत परभणीत सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज (मंगळवारी) परभणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आज 'सर्वोच्च न्यायालयात असलेल्या सुनावणीच्यावेळी महाराष्ट्र सरकारचा वकिलच गैरहजर राहिल्याच्या निषेधार्थ 'एक मराठा लाख मराठा, या सरकारचा करायचं काय' अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

परभणीत मराठा क्रांती मोर्चाचे जोरदार निदर्शने

राज्य सरकारविरोदात मराठा क्रांती मोर्चाची घोषणाबाजी

मराठा आरक्षणाच्या विषयी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असताना सरकारी वकीलच अनुपस्थित राहिले. परिणामी, न्यायालयाने सुनावणी काही काळासाठी तहकुब केली. चार आठवडे पुढे ढकलली. त्यामुळेच मराठा आरक्षणाच्या विषयावर राज्य सरकार हे फारसे गंभीर नाही, हेच स्पष्ट झाल्याचा आरोप मराठा क्रांतीमोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

अशोक चव्हाण यांनी केलेल्या 'त्या' विधानाचा निषेध -

उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी 'मराठा समाजाचा राज्य सरकारवर विश्वास नसेल तर आपला वकील लावावा', असे विधान करत समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याचा आरोपही या संतप्त कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे या सरकारचा तीव्र शब्दात निषेध करत आहोत, असे सुभाष जावळे, किशोर रणेर, विठ्ठल तळेकर, गजानन लव्हाळे, अरुण पवार, विजय जाधव, गजानन जोगदंड, रवी घयाळ व अशोक बोकन आदी आंदोलनकर्त्यांनी म्हटले. यावेळी या आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणून गेला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.