ETV Bharat / state

परभणीत महाआघाडीच्या नेत्यांचे '७०:३०' सूत्राविरोधात स्वाक्षरी आंदोलन

मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र हे एकाच राज्यातील प्रदेश असताना त्यात भेदभाव करून ७०:३० टक्के या वैद्यकीय प्रवेशाचे सूत्र तयार झाले. ज्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील गुणवंत विद्यार्थ्यांवर गेल्या कित्येक वर्षांपासून अन्याय होत आहे. त्यामुळे या विरोधात आता मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी व पालक पेटून उठले आहेत.

स्वाक्षरी आंदोलन
स्वाक्षरी आंदोलन
author img

By

Published : Sep 1, 2020, 5:19 PM IST

परभणी- वैद्यकीय प्रवेशासाठीचे ७०:३० हे सूत्र रद्द करण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविण्यासाठी संपूर्ण मराठवाड्यात स्वाक्षरी मोहीम राबविली जात आहे. त्याअंतर्गत आज परभणी येथील शिवाजी चौक येथून या स्वाक्षरी आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनात महाआघाडीतील शिवसेना खासदार संजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान यांच्यासह महाआघाडीतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी तसेच पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र हे एकाच राज्यातील प्रदेश असताना त्यात भेदभाव करून ७०:३० टक्के हे वैद्यकीय प्रवेशाचे सूत्र तयार झाले. ज्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील गुणवंत विद्यार्थ्यांवर गेल्या कित्येक वर्षांपासून अन्याय होत आहे. त्यामुळे या विरोधात आता मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी व पालक पेटून उठले आहेत. या पार्श्वभूमीवर आजपासून स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली असून स्वाक्षरीचे पत्र आता मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे.

माहिती देताना शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील

दरम्यान, यापूर्वी महाआघाडीच्या लोकप्रतिनिधींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या पुढे निदर्शने करून जोरदार आंदोलन केले होते. त्यानंतर आता हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात आले आहे. दरम्यान, वैद्यकीय प्रवेशासाठी सध्या महाराष्ट्र राज्यात अस्तित्वात असलेले व मराठवाड्यावर घोर अन्याय करणारे ७०:३० टक्के हे सूत्र रद्द करावे, या मागणीसाठी खासदार संजय जाधव यांच्यासह पालकांच्यावतीने यापूर्वी स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांसमोर तीव्र निदर्शने करण्यात आली होती. तसेच, पालकांच्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले होते. तेव्हा पालकमंत्र्यांनी हा विषय राज्याच्या कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीत ठेऊन त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र, या संदर्भात फारशी कारवाई न झाल्याने पालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे, मराठवाड्यावरील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे ७०:३० टक्के हे सूत्र रद्द करावे, म्हणून आता मुख्यमंत्र्याकडे साकडे घालण्यात आले. मात्र जोपर्यंत हे सूत्र रद्द होत नाही, तोपर्यंत मराठवाडाभर व्यापक प्रमाणावर जन आंदोलन छेडले जाणार आहे. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून आजपासून मराठवाडाभर नागरिकांकडून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत असून, स्वाक्षऱ्यांचे हे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना आमदार डॉ. राहुल पाटील म्हणाले, या संदर्भात आम्ही विधानसभेत देखील आवाज उठवला आहे. ही बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही निदर्शनास आणून देण्यात आली असून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी नुकतीच मराठवाड्यातील काही आमदारांसह त्यांच्या दालनात बैठक घेतली. यावेळी त्यांनी देखील येत्या सहा महिन्यात यावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु, गेल्या कित्येक वर्षांपासून मराठवाडा आणि विदर्भातील पालक या संदर्भात लढा देत आहेत, मात्र त्याला यश मिळत नसल्याने हा लढा आणखी तीव्र करण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आंदोलनात, शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील, काँग्रेसच्या महापौर अनिता सोनकांबळे, उपमहापौर भगवान वाघमारे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर उपस्थित होते.

हेही वाचा- धक्कादायक; परभणीच्या जिल्हा रुग्णालयातून तीन कोरोनाबाधित बंदिवान फरार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.