ETV Bharat / state

'हे तर जनतेचं शोषण'... परभणीत भाजपातर्फे वीज बिलांची होळी - pravin darekar news

वाढीव वीज बिलं माफ करण्याच्या मागणीसाठी भाजपातर्फे राज्यभरात आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर परभणीत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वात निषेध नोंदवण्यात आला.

pravin darekar in parbhani
'हे तर जनतेचं शोषण'... परभणीत भाजपातर्फे वीज बिलांची होळी
author img

By

Published : Nov 23, 2020, 8:17 PM IST

Updated : Nov 23, 2020, 10:56 PM IST

परभणी - महामारीसारख्या कठीण परिस्थितीत नागरिकांना महाविकास आघाडी सरकारने कोणतीही सवलत दिली नाही. उलटपक्षी नागरिकांच्या जखमेवर वाढीव वीज बिलं देऊन मीठ चोळण्याचं काम केल्याची टीका विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. आता ही वाढीव बिले कशी योग्य आहेत, हे समजावून सांगत वसुलीचा तगादा लावणारं हे सरकार जनतेचे रक्त शोषणाचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. दरेकर यांच्या नेतृत्वात परभणीच्या जिंतूर रोडवरील वीज महामंडळाच्या कार्यालयापुढे वाढीव बिलाची होळी करत भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

'हे तर जनतेचं शोषण'... परभणीत भाजपातर्फे वीज बिलांची होळी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना देण्यात आलेली वीज बिलं माफ करावी, वाढीव बिल कमी करावे, या मागणीसाठी भाजपातर्फे राज्यभरात आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर परभणीत देखील आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वात निषेध नोंदवण्यात आला. या आंदोलनात आमदार मेघना बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, माजी आमदार मोहन फड, प्रदेश सदस्य विठ्ठलराव रबदडे, प्रदेश सदस्य अभय चाटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांसह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

'500-700 रुपये भरणाऱ्या ग्राहकांना 10 हजारांचे अवाजवी बिल'

महाराष्ट्रात वाढीव वीज बिलांचा प्रश्न पेट घेत आहे. जे ग्राहक 500 ते 700 रुपयांचे वीज बिल भरायचे, त्यांना दहा ते पंधरा हजार रुपयांचे अवाजवी बिल आले आहे. अशा परिस्थितीत शासनाने ही रक्कम निम्मी करण्याचे आश्वासन दिले. हे म्हणजे पाचशे रुपयांचे बिल येणाऱ्या ग्राहकाने पाच हजार रुपये भरायचे, अशा प्रकारची बनवाबनवी आहे, असे दरेकर म्हणाले.

'वचनाचा आणि या सरकारचा संबंध नाही'

वचनाचा आणि या सरकारचा काही संबंध नाही. कारण मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेलं वचन अद्याप पाळलेलं नाही. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपये देण्याचं वचन या सरकारने दिलं. मात्र त्यांच्या खात्यावर अजून पैसे आलेले नाहीत. विजेच्या बाबतीत देखील वीज मंत्र्यांनी तोच कित्ता गिरवला. जी मागणी जनतेने केलीच नाही, त्याचे आश्वासन दिले. या सरकारने 100 युनिटपर्यंत मोफत वीज देऊ, असे सांगितले. मात्र, 1 युनिटही मोफत वीज दिलेली नाही. उलटपक्षी अवाजवी बिलं देऊन ग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा काम या सरकारने केले आहे, असे दरेकर म्हणाले.

'मुख्यमंत्र्यांच्या संवादात फक्त प्रबोधन'

हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे. या सरकारला जनतेच्या प्रश्नांची कुठलीही जाणीव नाही. काल मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. या संवादात जनतेच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, अडचणींवर कुठलेही भाष्य नव्हते. त्या सोडवण्यासाठी कोणत्याही उपाययोजना नव्हत्या. त्यांनी फक्त प्रबोधन करण्याचा काम केल्याचे दरेकर म्हणाले.

Last Updated : Nov 23, 2020, 10:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.