ETV Bharat / state

डॉक्टरांचा अक्षम्य हलगर्जीपणा; नवजात बाळाच्या मांडीमध्ये तब्बल १५ दिवस राहिली सुई - DOCTOR

दरम्यान, या गंभीर प्रकाराची तात्काळ चौकशी करुन यामध्ये दोषी आढळणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यावर दोन दिवसामध्ये कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नातेवाईकांनी दिला आहे.

परभणी
author img

By

Published : Jul 12, 2019, 9:27 PM IST

Updated : Jul 12, 2019, 11:12 PM IST

परभणी - जिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या एका बालकाला ४ दिवसानंतर काविळाचा विलाज करण्यासाठी पुन्हा जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु राहत केंद्रात दाखल करण्यात आले होते. परंतु, या ठिकाणी उपचारादरम्यान डॉक्टर अथवा परिचारिकेकडून त्या बालकाच्या मांडीत देण्यात आलेली सुई खुडून मांडीतच राहिल्याचा प्रकार घडला आहे. रुग्णालय प्रशासनाच्या या गलथान कारभारावर सर्व स्तरातून संताप व्यक्त होत असून संबंधित दोषींवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

दिक्षा आतम उंडे (रा. रायपुर ता . सेलु जि. परभणी) असे या महिलेचे नाव आहे. त्या बाळांतपणासाठी २३ जूनला जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यानंतर २४ जूनला त्यांचे सिजर होवून त्यांना मुलगा झाला. मात्र, त्यानंतर त्या बाळाला कावीळाचे लक्षण जाणवल्याने त्याला विशेष नवजात शिशु अति दक्षता कक्षात दाखल करण्यात आले. त्यानंतर बाळाला व आईला दोन दिवसात सुट्टी देण्यात आली. परंतु बाळ सतत जोरजोरात रडत होते. त्याला होणाऱ्या वेदना कोणाच्याही लक्षात येत नव्हत्या, बाळाच्या आईने दवाखान्यातील कर्मचाऱयांना बऱयाच वेळेस विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु बाळ नवीन-नवीन काही दिवस रडत असते, असे म्हणून त्यांना टाळण्यात आले. परंतु १५ दिवसानंतर बाळाची आजी त्याला अंघोळ घालत असताना त्यांच्या हाताला काहीतरी टोचल्याचे जाणवले, त्यावेळी त्यांनी बारकाईने पाहिले असता बाळाच्या मांडीमध्ये इंजेक्शनची सुई निघाली. त्या सुईच्या ठिकाणी बाळाच्या मांडीमध्ये गाठ देखील आली आहे.

नवजात बाळाच्या मांडीमध्ये चक्क सुई; परभणी जिल्हा रुग्णालयाचा गलथान प्रकार

ही अतिशय गंभीर बाब असून यामुळे बाळाच्या जिवालाही धोका निर्माण होवु शकतो. परंतू या संदर्भात रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांना विचारले असता त्यांनी याचे दुष्परिणाम होणार नाहीत. शिवाय यातील दोषींवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. दुसरीकडे या प्रकाराबद्दल सदर महिला आणि तिच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे

दरम्यान, या गंभीर प्रकाराची तात्काळ चौकशी करुन यामध्ये दोषी आढळणाऱया अधिकारी, कर्मचाऱ्यावर दोन दिवसामध्ये कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिक्षा आतम उंडे (बाळाची आई ) किर्तीकुमार बुरांडे, सयद अजहर, सचिन देशपांडे, शेख नदीम,सय्यद अस्लम, पवन कटकुरी, इरशाद पाशा, सुनिल देशमुख, मिना अंबोरे आदींनी एका निवेदनाद्वारे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रकाश डाके यांना दिला आहे.

Intro:परभणी - परभणीच्या जिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या एका बालकाला चार दिवसानंतर काविळाचा विलाज करण्यासाठी पुन्हा जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु राहत दाखल करण्यात आले होते ; परंतु या ठिकाणी उपचारादरम्यान डॉक्टर अथवा परिचारिकेकडून त्या बालकाच्या मांडीत देण्यात आलेली सुई खुडून मांडतच राहिल्याचा प्रकार घडला आहे. रुग्णालय प्रशासनाच्या या गलथान कारभारावर सर्व स्तरातून संताप व्यक्त होत असून संबंधित दोषींवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.Body:दिक्षा आतम उंडे (रा. रायपुर ता . सेलु जि.परभणी) असे या महिलेचे नाव आहे. त्या बाळांतपणासाठी २३ जुन रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यानंतर २४ जून रोजी त्यांचे सिजर होवुन त्यांना मुलगा झाला. मात्र सदर बाळाला कावीळाचे लक्षण जाणवल्याने त्याला विशेष नवजात शिशु अति दक्षता कक्षात दाखल करण्यात आले. त्यानंतर बाळाला व आईला दोन दिवसात सुट्टी देण्यात आली. परंतु बाळ सतत रडत होत आणि बाळाचे रडणे दुस-या बाळा सारखे सामान्य नव्हते. ते रात्रंदिवस रडत होते. त्याला होणा-या वेदना कोणाच्याही लक्षात येत नव्हत्या, बाळाच्या आईने दवाखान्यातील कर्मचा-यांना ब-याच वेळेस विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु बाळ नविन-नविन काही दिवस रडत असते, असे म्हणुन त्यांना टाळण्यात आले. परंतु १५ दिवसानंतर बाळाची आजी त्याला अंघोळ घालत असताना त्यांच्या हाताला काहीतरी टोचल्याचे जाणवले, त्यावेळी त्यांनी बारकाईने पाहीले असता बाळाच्या मांडीमध्ये इंजेक्शनची सुई निघाली. सदर सुईच्या ठिकाणी बाळाच्या मांडीमध्ये गाठ देखील आली आहे. वास्तविक पाहता ही अतिशय गंभीर बाब असुन यामुळे बाळाच्या जिवीतास देखील धोका निर्माण होवु शकतो. परंतू या संदर्भात रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांना विचारले असता त्यांनी याचे दुष्परिणाम होणार नाहीत. शिवाय यातील दोषींवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे या प्रकाराबद्दल सदर महिला आणि तिच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे
दरम्यान, या गंभीर प्रकाराची तात्काळ चौकशी करुन यामध्ये दोषी आढळणा-या अधिकारी, कर्मचा-यावर दोन दिवसामध्ये कारवाई करण्यात यावी, अन्यथा उग्र अंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिक्षा आतम उंडे (बाळाची आई ) किर्तीकुमार बुरांडे, सयद अजहर, सचिन देशपांडे, शेख नदीम,सय्यद अस्लम, पवन कटकुरी, इरशाद पाशा, सुनिल देशमुख, मिना अंबोरे आदींनी एका निवेदनाद्वारे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रकाश डाके यांना दिला आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- photo, Vo-Vis & byte (pkg).Conclusion:
Last Updated : Jul 12, 2019, 11:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.