ETV Bharat / state

परभणी जिल्ह्यात डिवायएसपींच्या जीपला अपघात; ठेकेदारासह अभियंत्यावर गुन्हा दाखल - DySP accident news purna

जिल्ह्यातील पूर्णा-चुडावा मार्गावर प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या वाहनाचा जोरदार अपघात झाला. या अपघातात प्रभारी उपविभागीय अधिकारी सुभाष राठोड जखमी झाले आहेत. रस्त्यावर दिशादर्शक नसल्याने हा अपघात झाल्याचा आरोप करत राठोड यांनी या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

DySP Subhash Rathod Accident purna
डिवायएसपींच्या जीपला अपघात
author img

By

Published : Apr 3, 2021, 7:44 PM IST

परभणी - जिल्ह्यातील पूर्णा-चुडावा या मार्गावर प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या वाहनाचा जोरदार अपघात झाला. या अपघातात प्रभारी उपविभागीय अधिकारी सुभाष राठोड जखमी झाले आहेत. रस्त्यावर दिशादर्शक नसल्याने हा अपघात झाल्याचा आरोप करत राठोड यांनी या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, सुभाष राठोड यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - परभणीत ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू; हलगर्जी करणारे अधिकारी फैलावर

अपघातात वाहनाचे नुकसान झाले असून, राठोड यांच्यासह गाडीतील 2 कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. याप्रकरणी राठोड यांच्या तक्रारीवरून चुडावा पोलीस ठाण्यात रस्त्याचे ठेकेदार आणि अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी पंडित करत आहेत. राठोड यांच्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

हेही वाचा - परभणी आरोग्य विभागाला मिळाल्या 3 नव्या रुग्णवाहिका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.