ETV Bharat / state

परभणी जिल्ह्याला वादळी वाऱ्याचा फटका; घरावरील पत्रे उडाल्याने ११ जण जखमी

पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव आणि धनगर टाकळी येथे रात्री साडेआठ वाजता झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसात घरावरील पत्रे उडून गेली. विद्युत खांब वाकले, तर काही उन्मळून पडले. त्यामुळे अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. शिवाय झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत.

जखमींवर उपचार सुरू
author img

By

Published : Jun 4, 2019, 10:33 AM IST

परभणी - जिल्ह्यातील पूर्णा आणि पालम तालुक्यात सोमवारी रात्री ८ ते १० वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पूर्णामधील पिंपळगाव आणि धनगर टाकळी येथील अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. परिणामी घरावर ठेवलेली दगड लोकांच्या अंगावर पडून ११ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव आणि धनगर टाकळी येथे रात्री साडेआठ वाजता झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसात घरावरील पत्रे उडून गेली. विद्युत खांब वाकले, तर काही उन्मळून पडले. त्यामुळे अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. शिवाय झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. पिंपळगाव येथील एका घरातील पत्र्यावर ठेवलेले दगड पडून ३ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. मिनाबाई गणपत सूर्यवंशी (वय ४८), सावीत्रीबाई गणपत सुर्यवंशी (४०), सुमन वैजनाथ रेंगडे (६० ) असे जखमींचे नावे आहेत. त्यांना नांदेड येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

पिंपळगाव येथील सरस्वती कुंडलीक बनसोडे (वय ४५), गंगूबाई वामनराव बनसोडे (६०), कुंडलीक माणीकराव बनसोडे (६२), सुदर्शन गंगाधर खारोडे (७), शुभम कुंडलीक बनसोडे (११), देवराव नारायण बनसोडे (३०) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पूर्णा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच पिंपळगाव येथील जनावरे देखील मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत. या प्रमाणेच धनगर टाकळी येथील श्यामराव आनेराव माठे (५५), तर खांबेगाव येथील खंडू पांडोजी चावरे (६५) हे देखील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पूर्णेतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी रुग्णालयात जखमींची भेट घेतली. तसेच तहसीलदार आणि महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते.

या वादळी वाऱ्यानंतर पालम तालुक्यातील काही गावात तसेच शहरात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. वाऱ्यामुळे शहरातील अनेक होर्डींग्ज जमीनदोस्त झाले आहेत. पावसामुळे शहरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Intro:परभणी - मराठवाड्यातील काही जिल्ह्यात ४८ तासांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला होता, हा अंदाज खरा ठरत मराठवाड्यात सायंकाळी पावसाने हजेरी लावली. त्यात परभणी जिल्ह्यातील पूर्णा आणि पालम तालुक्यात रात्री 8 ते 10 वाजेच्या दरम्यान जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने हाहाकार उडाला. यात पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव व धनगर टाकळी येथे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. ज्यामुळे घरातील लोकांच्या अंगावर दगड पडून त्यांची डोकी फुटली आहेत. त्यातील 9 जखमींवर पूर्णेतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दोघांना नांदेड येथे हलविण्यात आले आहे.Body:पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव आणि धनगर टाकळी येथे रात्री साडेआठ वाजता झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसात घरावरील पत्रे उडून गेली. विद्युत खांब वाकले आहेत तर काही उन्मळून पडले. ज्यामुळे अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. शिवाय झाडांच्या फांद्या तुटून पडले आहेत. पिंपळगाव येथील एका घरातील पत्रांवर ठेवलेले दगड पडून तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. मिनाबाई गणपत सूर्यवंशी (48), सावीत्रीबाई गणपत सुर्यवंशी (40) सुमन वैजनाथ रेंगडे (60 ) अशी त्यांची नावे असून त्यांना नांदेड येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. या खेरीज पिंपळगाव येथील सरस्वती कुंडलीक बनसोडे (वय ४५), गंगूबाई वामनराव बनसोडे (६०), कुंडलीक माणीकराव बनसोडे (६२), सुदर्शन गंगाधर खारोडे (७), शुभम कुंडलीक बनसोडे (११), देवराव नारायण बनसोडे (३०) जखमी आहेत. त्यांच्यावर पूर्णा येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. तसेच पिंपळगाव येथील जनावरे देखील मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत. या प्रमाणेच धनगर टाकळी येथील श्यामराव आनेराव माठे (५५) तर खांबेगाव येथील खंडू पांडोजी चावरे (65) हे देखील जखमी झाले असूूून त्यांच्यावर सुद्धा पूर्णेतील दवाखान्यात उपचार करण्यात येत आहेत. या जखमींची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी पदाधिकाऱ्यांसह जाऊन विचारपूस केली आहे. तर दवाखान्यात तहसीलदार आणि महसूल चे अधिकारी व कर्मचारी सुद्धा उपस्थित होते.
दरम्यान, या वादळी वाऱ्यानंतर पालम तालुक्यातील काही गावात तसेच शहरात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. तर शहरातील अनेक होल्डिंग या वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाले आहेत. वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे शहरातील घरासह दुकानावरील अनेकांचे पत्र उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. या पावसामुळे शहरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र मागील अनेक दिवसांपासून उखाड्याने त्रासलेल्या नागरिकांना पावसाच्या सरींमुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- जखमींचे photoConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.