ETV Bharat / state

परभणीत गुटखा माफियाच्या घरावर छापेमारी; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपी मोहम्मद इद्रीस याच्या घरी गुटखा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी रात्री पोलिसांच्या पथकाने आरोपीच्या मगदुमपुरा येथील घरावर छापा टाकला. तेव्हा तेथे विविध कंपन्यांची पाच खोकी गुटखा आढळला. पोलिसांनी हा साठा जप्त करून गुटखा माफिया मोहम्मद इद्रिस याला अटक केली. या गुटख्याची एकूण किंमत 2 लाख 50 हजार रुपये आहे.

author img

By

Published : Sep 3, 2020, 11:50 AM IST

Gutka
गुटखा

परभणी - नवामोंढा पोलिसांनी बुधवारी रात्री एका गुटखा माफियाच्या घरावर धाड टाकली. या कारवाईत अडीच लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांनी मगदुमपुरा परिसरात ही कारवाई केली.

आरोपी मोहम्मद इद्रीस याच्या घरी गुटखा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी रात्री पोलिसांच्या पथकाने आरोपीच्या मगदुमपुरा येथील घरावर छापा टाकला. तेव्हा तेथे विविध कंपन्यांची पाच खोकी गुटखा आढळला. पोलिसांनी हा साठा जप्त करून गुटखा माफिया मोहम्मद इद्रिस याला अटक केली. या गुटख्याची एकूण किंमत 2 लाख 50 हजार रुपये आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रागासूधा. आर., सहाय्यक पोलीस अधीक्षक नितिन बगाटे, पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजु मुत्तेपोड, फौजदार शिवाजी बोंडले, फौजदार राधिका भावसार यांच्या पथकाने केली.

लॉकडाऊनच्या काळात पोलिसांचे लक्ष कोरोनाच्या बंदोबस्तात असल्याने जिल्ह्यातील गुटखा आणि वाळू माफियांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. लॉकडाऊनमध्ये पान टपऱ्या बंद असल्या तरी गुटखा, पान तंबाखू मात्र सर्रास उपलब्ध होत होता. आताही गुटख्याची सर्वत्र विक्री होत आहे. याला जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत असून, गुटखा विक्रेत्यांवर कुठलीही ठोस कारवाई होत नाही.

दीड वर्षांपासून जिल्ह्यातील वाळूघाटांचे लिलाव झालेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या अंधारात गोदावरी, पूर्णा, दुधना आदी प्रमुख नद्यांसह लहान नदी, नाल्यांच्या पात्रातून वाळूचा बेसुमार उपसा सुरू आहे. त्याप्रमाणेच गुटख्याची देखील बेसुमार आणि सर्रास विक्री होत आहे. याकडे पोलिसांनी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.